agriculture news in Marathi recovery in sugar rate Maharashtra | Page 2 ||| Agrowon

साखर दरात सुधारणा 

राजकुमार चौगुले
सोमवार, 22 जून 2020

देशात सुरू झालेली अनलॉकची प्रक्रिया व साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करण्याबाबत सुरू असलेल्या केंद्राच्या हालचालींमुळे देशांतर्गत बाजारात साखरेला मागणी वाढू लागली आहे.

कोल्हापूर ः देशात सुरू झालेली अनलॉकची प्रक्रिया व साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करण्याबाबत सुरू असलेल्या केंद्राच्या हालचालींमुळे देशांतर्गत बाजारात साखरेला मागणी वाढू लागली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ठप्प झालेली साखर विक्री गती घेत आहे. याचा सकारात्मक परिणाम साखरेच्या दरावरही झाला आहे. गेल्या सप्ताहापासून साखरेच्या विक्री दरात क्विंटलला ५० ते ८० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. पहिल्यांदाच साखर विक्रीच्या हालचाली आता कारखाना स्तरावरून वेग पकडत आहेत. 

मे च्या उत्तरार्धापासून केंद्राने काही कालावधीकरिता अनलॉकचे धोरण स्वीकारले. यामुळे ज्या भागात कोविडचा कमी प्रादुर्भाव आहे अशी शहरे पूर्वस्थितीवर येत आहे. अनेक घटकांना कालावधीचे बंधन असले तरी साखरेवर आधारित उद्योगधंदे सुरू होऊन दोन ते तीन आठवडे उलटून गेल्यानंतर त्याचा सकारात्मक परिणाम साखरेच्या वापरावर होत असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. 

सरकारने मे महिन्याच्या साखर विक्रीचा कोटा वाढवून दिला आहे. उत्तर भारतातील साखर कारखान्यांनी मे चा साखर विक्री कोटा पूर्ण केला आहे. पश्‍चिम, दक्षिणेकडील कारखान्यांचा रखडलेला कोटा आता हळूहळू निर्गत होत आहे. अनेक कारखान्यांकडे मे च्या कोट्याची अगदी थोडी साखर शिल्लक आहे. त्या साखरेची विक्री करण्याची मुदत जूनपर्यंत वाढवून दिल्याने मे चा कोटा येत्या काही दिवसांत पूर्ण होण्याची शक्‍यता कारखानदार सूत्रांनी व्यक्त केली. 

केंद्राने जूनचा कोटा १० लाख टन इतका दिला आहे. हा कोटा पूर्ण करण्यातही उत्तर प्रदेशच्या कारखान्यांनी आघाडी घेतली. महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडूतील कारखाने हळूहळू साखर विक्री करत आहेत. अपवाद वगळता ही राज्ये अनलॉकच्या स्थितीत आहेत. सामाजिक अंतराची मर्यादा पाळून वस्तूंची विक्री सुरू झाल्याने आता उत्पादक साखरेची मागणी करू लागले आहेत. येत्या काही दिवसांत साखरेची मागणी वाढण्याचा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांचा आहे. 

‘एमएसपी’ वाढीच्या हालचालीचाही परिणाम 
सप्ताहापूर्वी केंद्र सरकारने एफआरपीसह साखरेच्या किमान विक्री दरातही वाढ करण्याबाबत सूतोवाच केले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडे ही मागणी संबंधित खात्यांनी केली आहे. याचा परिणामही साखरेच्या किमतीवर झाला. भविष्यात साखरेच्या किमती वाढतील या शक्‍यतेने सध्या व्यापाऱ्यांकडून साखर खरेदीसाठी पसंती दिली जात आहे. यामुळे दरातही वाढ झाल्याचे साखर कारखानदार सूत्रांनी सांगितले.


इतर अॅग्रोमनी
कृषी सलग्न व्यवसायासाठी ‘मुद्रा’मुद्रा योजनेत तीन प्रकार आहेत.  शिशू...
‘कोरोना’विषयक सेवेतून आम्हाला मुक्त करा...पुणे : ‘राज्यातील ९ हजार कृषी सहायकांना विविध...
एप्रिलमध्ये यंदा खत विक्रीत देशात ७१...नवी दिल्लीः कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात...
तारण अन् गहाणखतज्या चल बाबी आहेत, त्यांचे जे तारण बँक घेते,...
जळगावचा सुवर्णबाजारात ४२ दिवसानंतर...जळगाव ः राज्यभरात प्रसिद्ध असलेला जळगावचा...
पुढील हंगामावरही शिल्लक साखरेचे ओझे? कोल्हापूर: देशात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत...
इंडोनेशिया, इराणकडून साखरेला मागणी कोल्हापूर: गेल्या दोन महिन्यांपासून साखर...
गावबंदी सर्व्हेक्षण : भाज्या, फळांचे ६०...कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे राज्यात लावलेली...
डाळ उद्योग अडचणीत; ३० कोटींचा फटकाजळगाव : कोरोनाच्या संकटात खानदेशातील डाळ...
देशभरातील शेतकऱ्यांकडे ७० टक्के हळद...सांगली : देशातील महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश...
पारंपरिक शेतीला रेशीम शेतीसह...यवतमाळ जिल्ह्यातील टाकळी (ता. उमरखेड) येथील अनिल...
खातेदाराची ओळखआता पूर्वीप्रमाणे जुन्या खातेदाराची ओळख घेऊन खाते...
फळपिकांच्या निर्यातीसाठी एक्‍सपोर्ट...नागपूरः देशात द्राक्ष वगळता इतर फळांच्या...
पाकिस्तानमध्ये कापूस लागवड १२ टक्‍...नागपूर ः वातावरणातील बदलामुळे उत्पादकतेत होणारी...
कोरोना संकट : कृषी व पूरक उद्योगांसाठी...कोरोना संकटामुळे देशभरात शेतीमाल पुरवठा साखळी...
भारताचा विकासदर दीड टक्क्यांवर येणे...वॉशिंग्टन ः चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा...
साखर निर्यातीच्या प्रयत्नाला कोरोनाचा ‘...नवी दिल्ली : कोरोनाच्या भीतीपोटी आईसक्रीम,...
सहकारामुळे बॅंकिंग अन् शेतमाल विक्रीला...जर्मनीतील सहकारी बँकेमध्ये सीबीएस सिस्टिम उत्तम...
राज्यात शेतकऱ्यांच्या घरात ८० लाख क्‍...नागपूर ः लॉकडाउनमुळे शासकीय कापूस खरेदी बंद आहे....
जग महामंदीच्या उंबरठ्यावर उभे :...नवी दिल्ली : जागतिक पातळीवर कोविड-१९ च्या...