नगर जिल्हा परिषदेत सव्वासातशे पदांची भरती

नगर जिल्हा परिषदेत सव्वासातशे पदांची भरती
नगर जिल्हा परिषदेत सव्वासातशे पदांची भरती

नगर ः जिल्हा परिषदेत वेगवेगळ्या गट ‘क’ सवंर्गातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील व अनूसुचित क्षेत्रातील मिळून सुमारे ७२९ पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी २६ मार्चपासून ऑनलाइन अर्ज स्वीकृतीला सुरवात होणार असून १६ एप्रिलपर्यंत अर्ज संकेतस्थळावर स्वीकारले जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने यांनी दिली. आचारसंहिता संपल्यावर प्रक्रिया सुरू होणार आहे. 

जिल्हा परिषदेत गट ‘क’ संवर्गातील औषधनिर्माता, आरोग्यसेवक पुरुष व स्त्री, अंगणवाडी पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी कृषी, विस्तार अधिकारी, सांख्यिकी व महिला बालकल्याण, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ लेखाधिकारी आदी पदे रिक्त होती. त्याचा जिल्हा परिषदेच्या कामावर ताण येत होता. त्यामुळे जिल्हा परिषदेने पद भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्ज भरण्यापासून ते अन्य सर्व बाबीची माहिती जिल्हा परिषदेने www.mahapariksha.gov.in व www.nagarzp.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. 

उमेदवारांना २६ मार्चपासून विविध पदांसाठी अर्ज भरता येणार आहेत. १६ एप्रिलपर्यंत ही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू राहील. भरती प्रक्रियेत अनुसूचित क्षेत्राबाहेरील (नॉन पेसा) मध्ये औषध निर्माताच्या १३, आरोग्यसेवक (पुरुष) (हंगामी फवारणी उमेदवारातून) ११८, पुरुष आरोग्य सेवकांच्या सर्वसाधारणमधून ८२, आरोग्य सेवक महिलांसाठी ३२९, अंगणवाडी पर्यवेक्षिकांसाठी ८, कृषी विस्तार अधिकारी पदाच्या २, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी (सांख्यिकीच्या) १, महिला बालकल्याण विस्तार अधिकाऱ्यांच्या २, प्रयोगशाळा तंत्रज्ञानाच्या ३, कंत्राटी ग्रामसेवकाच्या ६५, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदासाठी ४८, वरिष्ठ सहायक लिपिक पदासाठी ११, वरिष्ठ सहायक लेखा पदासाठी १२, कनिष्ठ लेखाधिकारी पदासाठी ४ असे ६९८ पदे असून अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) आरोग्यसेवक (पुरुष) (हंगामी फवारणी उमेदवारातून) १, पुरुष आरोग्य सेवकांच्या सर्वसाधारणमधून ६, आरोग्य सेवक महिलांसाठी २३ व अंगणवाडी पर्यवेक्षिकांचे १ पद आहे असे माने यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेत ७२९ पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी अर्ज मागविण्याचा कालावधी निश्‍चित केला आहे. आचारसंहितेनंतरच भरतीची प्रक्रिया होईल.  - वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com