कृषी सेवक पदभरतीसाठी प्रतीक्षा यादी तयार करा

अमरावती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या कृषी सेवक पदाची प्रतीक्षा यादीनुसार योग्य त्या उमेदवारांची नियुक्ती करावी, अशी मागणी या भरती प्रक्रियेच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी केली आहे.
कृषी सेवक पदभरतीसाठी प्रतीक्षा यादी तयार करा For recruitment of agricultural servants Create a waiting list
कृषी सेवक पदभरतीसाठी प्रतीक्षा यादी तयार करा For recruitment of agricultural servants Create a waiting list

अकोला : अमरावती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या कृषी सेवक पदाची प्रतीक्षा यादीनुसार योग्य त्या उमेदवारांची नियुक्ती करावी, अशी मागणी या भरती प्रक्रियेच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी केली आहे. गेल्या दोन वर्षांत वेळोवेळी निवेदने देऊन सुद्धा आजवर पदरात केवळ निराशाच पडल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. अमरावती विभागात कृषी सेवक पदासाठी २४ फेब्रुवारी २०१९ मध्ये हजारो उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यानंतर ७ जानेवारी २०२० रोजी या पदासाठी अंतिम पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. यादीनुसार १७९ उमेदवार पात्र होते. त्यापैकी ३० उमेदवार दस्तऐवज चाचणी व इतर कारणामुळे अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे ७ जानेवारीला प्रसिद्ध केलेल्या यादीतील १७९ जागांपैकी १४९ पदे भरण्यात आली. अमरावती विभाग सोडून इतर विभागात देखील कृषी सेवकांची पदे भरण्यात आली व अंतिम यादी झाल्यानंतर रिक्त जागांसाठी प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली. जाहिरातीतील समांतर आरक्षणातील माजी सैनिक व इतर आरक्षित पदासाठी पात्र उमेदवार उपलब्ध न होऊ शकल्याने ती पदे अरक्षित करून प्रतीक्षा यादीतील सर्वसाधारण उमेदवारांची नियुक्तीसाठी कार्यवाही सुरु करण्यात आली. मात्र अमरावती विभागात अजूनही प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केलेली नाही. परीक्षा देऊन दोन वर्षे झाली तरी अजूनही आम्ही नोकरीच्या प्रतीक्षेत आहोत, असे कृषी पदवीधर युवा शक्ती संघटनेने म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com