सहकार विकास महामंडळासाठी लवकरच अधिकारी भरती

सहकार विकास महामंडळासाठी लवकरच अधिकारी भरती
सहकार विकास महामंडळासाठी लवकरच अधिकारी भरती

पुणे : मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या बंद अवस्थेतील सहकार विकास महामंडळाची पुनर्रचना करीत ऊर्जितावस्था आणण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून महामंडळाची पुनर्रचना करण्यात आली असून, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर कामकाज सुरळीत करण्यासाठी मुख्यालय आणि विभागीय कार्यालयांसाठी सुमारे ४० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कंत्राटी व प्रतिनियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून सहकारी संस्थांना वित्तपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या महामंडळाची पुनर्रचना करण्यात आली असून, कंपनी कायद्याखाली महामंडळाची नाेंदणी करण्यात आली आहे. तर जुने संचालक मंडळ बरखास्त करून आता केवळ सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पणन संचालक, सहकार आणि साखर आयुक्तांची संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महामंडळाचे कामच बंद असल्याने रिझर्व्ह बॅंक आॅफ इंडियाने महामंडळाचा परवाना रद्द केला हाेता. हा परवाना पुन्हा मिळविण्याची प्रक्रिया सुरू केली असून, येत्या १५ दिवसांत परवाना मिळाल्यानंतर सहकारी संस्थांना वित्त पुरवठा करण्याबराेबरच भागभांडवल उभारणीसाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com