agriculture news in Marathi, red chili at rupees in solapur, Maharashtra | Agrowon

सोलापुरात लाल मिरची पोचली शंभर रुपयांवर

सुदर्शन सुतार
मंगळवार, 27 मार्च 2018

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात लाल मिरची, लसणाची आवक वाढली, तरीही मागणी चांगली असल्याने त्यांच्या दरातील तेजी टिकून राहिली. लाल मिरचीला प्रतिकिलो सर्वाधिक १०० रुपये इतका दर मिळाला. त्याशिवाय लसणाला सर्वाधिक ३० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात लाल मिरची, लसणाची आवक वाढली, तरीही मागणी चांगली असल्याने त्यांच्या दरातील तेजी टिकून राहिली. लाल मिरचीला प्रतिकिलो सर्वाधिक १०० रुपये इतका दर मिळाला. त्याशिवाय लसणाला सर्वाधिक ३० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात लाल मिरचीची रोज १५० ते २५० क्विंटलपर्यंत आणि लसणाची १०० ते २०० क्विंटलपर्यंत रोजची आवक होती.  मिरचीची आवक या सप्ताहात काही दिवशी ४०० ते ५०० क्विंटलपर्यंतही पोचली, तर लसणाच्या आवकेतही जवळपास दुपटीने वाढ झाली. मिरची, लसूण दोन्हींची आवक स्थानिक भागातून झाली. आवकेत वाढ होत राहिली, तरी मागणीमुळे दर मात्र तेजीत राहिले. 

लाल मिरचीला प्रतिकिलो ४० ते १०० सरासरी ९० रुपये असा दर मिळाला. त्या आधीच्या सप्ताहातही त्यांच्या मागणी  आणि दरामध्येही तेजी अशीच टिकून  होती. लसणाला प्रतिकिलो १५ ते ३० व सरासरी २० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय वांगी, बटाटा, ढोबळी मिरची, गवार यांच्या दरातील तेजी टिकून राहिली. त्यांची आवक ही प्रत्येकी २० ते ५० क्विंटलपर्यंत राहिली.

वांग्याला प्रतिदहा किलोसाठी ७० ते १५० व सरासरी १२० रुपये, बटाट्याला १५० रुपये व सरासरी १०० रुपये आणि ढोबळी मिरचीला ८० ते १८० वसरासरी १५० रुपये आणि गवारीला २०० ते ४०० व सरासरी ३०० रुपये इतका दर मिळाला.

त्याशिवाय कांद्याच्या आवकेत आणि दरात या सप्ताहातात काहीसा चढ-उतार झाला. कांद्याची आवक रोज ८० ते १५० गाड्यांपर्यंत राहिली. कांद्याची सर्व आवक स्थानिक भागात राहिली, पण आवकेत फारशी वाढ झाली नाही, शिवाय दरही जैसे थे राहिले. कांद्याला प्रतिक्विंटल २०० ते ८०० व सरासरी ४०० रुपये असा दर मिळाला.


इतर ताज्या घडामोडी
अमरावती विभागात कर्जवाटपात...यवतमाळ : पीककर्ज वाटपासाठी शासनाने बँकांना...
आदिवासींच्या जमिनींचा शोध घेण्यासाठी ‘...बुलडाणा : संग्रामपूर तालुक्यातील चिचारी येथील...
यवतमाळमध्ये ६५ लाखांचे बोगस बीटी...यवतमाळ : जिल्ह्यात खरिपाची लगबग सुरू आहे. याचा...
काळ्याफिती लावून किसानपुत्रांचे आंदोलनआंबेजोगाई, जि. बीड : किसानपुत्र आंदोलनाच्या...
हमीभावाने एक हजार क्विंटल मका खरेदीऔरंगाबाद : आधारभूत किमतीने शेतीमाल खरेदी...
नांदेडमध्ये खरीप पेरणी सुरूनांदेड : जिल्ह्यात जून महिन्याच्या प्रारंभापासून...
पुणे जिल्ह्यातील आठवडी बाजार बंदचपुणे : ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्थेचा कणा असलेले...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत तीन...औरंगाबाद : यंदाच्या खरीप हंगामात १५ जून...
जळगाव जिल्ह्यातील कृषी केंद्रांची तपासणीजळगाव ः जिल्ह्यात कृषी केंद्रांमधील बियाणे साठा,...
नगरमध्ये साडेपाच हजार हेक्टरवर फळबाग... नगर : नगर जिल्ह्यात गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही...
मराठवाड्यात पीककर्ज वाटप धीम्या गतीनेच औरंगाबाद : मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी...
कोल्हापुरात पाऊस सुरूच; नद्यांच्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाच्या...
साखर कारखान्यांच्या कर्जांची चौकशी करानगर : शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायचे झाल्यास अत्यंत...
राष्ट्रीयीकृत बँकांच्या मदतीने...नाशिक : नाशिक जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून कर्ज...
‘किसानपुत्र आंदोलन’कडून काळ्या...औरंगाबाद : किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने शुक्रवारी...
द्राक्ष सल्ला : प्रतिकूल ढगाळ हवामानात...यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ढगाळ...
थायलंडचे शेतमजूर अन् मध्यम मार्गावरील...शेती म्हटली की सर्वत्र कमी जास्त प्रमाणात त्याच...
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...