Agriculture news in marathi; Red kandi arrival in Khandesh; Rate stable | Agrowon

खानदेशात लाल कांद्याची आवक घटली; दर स्थिर
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 जून 2019

जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये लाल कांद्याची आवक रोडावली असून, जळगाव बाजार समितीत गुरुवारी (ता. १३) फक्त ६०० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. दर ५५० ते १३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाले. 

जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये लाल कांद्याची आवक रोडावली असून, जळगाव बाजार समितीत गुरुवारी (ता. १३) फक्त ६०० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. दर ५५० ते १३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाले. 

दर मागील आठवडाभरापासून स्थिर आहेत. बुधवारी (ता. १२) ८०० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती. मागील वर्षी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात प्रतिदिन २८०० क्विंटलपर्यंतची आवक बाजारात झाली होती. मागील हंगाम किंवा मागील वर्षाच्या तुलनेत कांद्याची लागवड खानदेशात कमी झाली होती. धुळे, जळगावात मिळून सात ते आठ हजार हेक्‍टर लागवड अपेक्षित होती. परंतु फक्त तीन हजार हेक्‍टरवर लागवड धुळे व जळगावात मिळून झाल्याचे सांगितले जात होते. परिणामी बाजारात आवक सुरवातीपासून कमी आहे. 

दरम्यान, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दरात सुधारणा झाली. त्यापूर्वी दर किमान २५० व कमाल ८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. या महिन्यात कमाल दर १२०० रुपयांखाली गेलेले नाहीत. त्यात या आठवड्यात आणखी सुधारणा झाली असून, दर टिकून आहेत. आवक पुढे आणखी कमी होऊ शकते. कारण कमाल शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या लाल कांद्याची विक्री केली आहे. साठवणुकीची हवी तशी सुविधा नसल्याने कांद्याची जशी काढणी झाली, तशी विक्री अनेक शेतकऱ्यांनी केली होती. सध्या आवक जळगाव, यावल, भुसावळ व धुळे भागातून होत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यातील आवकही कमी झाली आहे.

मागील आठवड्यात प्रतिदिन सरासरी १२०० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती. पांढऱ्या कांद्याची तर कुठलीही आवक होत नसल्याचे सांगण्यात आले. दर्जेदार लाल कांद्यास कमाल १४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर काही शेतकऱ्यांना जळगाव बाजार समितीत मंगळवारी (ता. ११) व बुधवारी मिळाला.  जळगाव जिल्ह्यातील अडावद (ता. चोपडा), किनगाव (ता. यावल) येथील उपबाजारातही कांद्याची आवक रोडावली आहे. अडावद येथेही कांद्याचे कमाल दर १४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत असल्याचे सांगण्यात आले.  

इतर ताज्या घडामोडी
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...
परभणीत वांगी ८०० ते १५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात गवार प्रतिक्विंटल १२०० ते ६०००...जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये जळगाव ः कृषी...
पीकविम्याला मुदतवाढ देण्याची ‘...अकोला ः या हंगामात पीकविमा भरण्यासाठी २४ जुलै ही...
परडा येथे मक्यावर लष्करी अळीचा...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मक्यावर मोताळा...
अमरावती जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का...अमरावती  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३६१० रुपये...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
सातारा जिल्हा परिषदेचा १०० कोटींचा...सातारा : जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच मूळ...
पुण्यात पीकविम्यासाठी शिवसेना रस्त्यावरपुणे ः ‘कोण म्हणतो देणार नाय विमा घेतल्याशिवाय...
पुणे विभागातील कोरडवाहू पट्ट्यात टंचाई...पुणे : विभागातील पुणे, सातारा, कोल्हापूर...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उतरविला १...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गंत खरिपासाठी...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १५ चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील घटलेली चारा छावण्यांची...
अचूक पीक पेरणी अहवाल देणे शक्य नाही ः...बुलडाणा  ः जिल्ह्यातील पीक पेरणीचा...
आडसाली ऊस लागवडीला कोल्हापूर जिल्ह्यात...कोल्हापूर  : जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात...
परभणी कृषी विद्यापीठ उत्पादित अडीच हजार...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...