Agriculture news in marathi; Red onion cultivation declined in Khandesh | Agrowon

लाल कांदा लागवड खानदेशात घटली

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

जळगाव ः खानदेशात खरिपातील लाल कांद्याची लागवड सुमारे ५०० ते ६०० हेक्‍टरने घटली आहे. अनेक भागांत अतिपावसाने रोपांचे नुकसान झाले तर काही भागांत उन्हाळ्यात दर समाधानकारक नसल्याने शेतकऱ्यांनी लागवड टाळली. 

जळगाव ः खानदेशात खरिपातील लाल कांद्याची लागवड सुमारे ५०० ते ६०० हेक्‍टरने घटली आहे. अनेक भागांत अतिपावसाने रोपांचे नुकसान झाले तर काही भागांत उन्हाळ्यात दर समाधानकारक नसल्याने शेतकऱ्यांनी लागवड टाळली. 

कांद्याचे दर मागील वर्षी डिसेंबरपासून ते यंदा जुलैपर्यंत दबावात राहिले. मागील खरिपातील व रब्बीमधील कांद्याला उत्पादन खर्चाएवढा दर बाजारात न मिळाल्याने खानदेशात धुळे व जळगाव जिल्ह्यांतील लागवड या खरिपात कमी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी पीक परवडत नाही यामुळे लागवड टाळली. तर धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील चोपडा, यावल व जळगाव भागांत ज्यांनी कांदा लागवडीसंबंधी तयारी केली, त्यांच्या रोपवाटिकांमध्ये अतिपावसाने नुकसान झाल्याने संबंधित शेतकरी वेळेत लागवड करू शकले नाहीत. 

धुळे जिल्ह्यातील साक्री, धुळे व शिरपूर या भागांत मिळून सुमारे दीड ते दोन हजार हेक्‍टरवर खरिपातील कांदा आहे. तर जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, जळगाव, पाचोरा, जामनेर, चाळीसगाव या भागांत मिळून सुमारे एक हजार ते ११०० हेक्‍टरवर खरिपातील कांदा आहे. मागील हंगामात खानदेशात सुमारे चार हजार हेक्‍टरवर कांद्याची लागवड झाली होती. यंदा लागवड घटल्याने बाजारातील आवकही कमी राहील, अशी स्थिती आहे.

यातच ज्यांनी ऑगस्टच्या सुरवातीला लागवड केली, त्या शेतकऱ्यांच्या शेतात दिवाळीनंतर काढणी सुरू होईल. साक्री भागात काढणी या महिन्याच्या २२ किंवा २५ तारखेला सुरू होऊ शकते. हलक्‍या, मुरमाड भागांत पीक बऱ्यापैकी आहे. या भागात उत्पादन चांगले हाती येईल, असे सांगितले जात आहे.


इतर ताज्या घडामोडी
नागपूर जिल्ह्यात मोठा आणि तान्हा पोळा...नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे...
औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांना ८५००...औरंगाबाद :  जिल्ह्यातील ९६३ शेतकऱ्यांकडून...
मराठवाड्यात सुमारे ४७ लाख हेक्टरवर खरीपऔरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाचे सर्वसाधारण...
खानदेशात तीन दिवसांपासून भिज पाऊसजळगाव  ः खानदेशात मागील तीन दिवसांपासून भिज...
अमळनेरमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढलावावडे, जि. जळगाव  : अमळनेर तालुक्यात जवळपास...
खडकवासलातून ११ हजार ७३५ क्युसेक विसर्गपुणे : खडकवासला धरणातून बुधवार (ता. १२) पासून...
सातपुड्यात मूगाच्या नुकसानीची शक्यताजळगाव  ः खानदेशात सातपुडा पर्वत भागात पाऊस...
गडचिरोलीत युरियाची कृत्रिम टंचाईगडचिरोली : जिल्ह्यात दोन महिन्यानंतर बरसलेल्या...
परभणीत बँकांचे उंबरठे झिजवून...परभणी : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंका...
मुंगळा परिसरात रानडुकरांचा धुडगूसमुंगळा जि. वाशीम ः चांगल्या पावसामुळे यंदा या...
‘रासाका’ सुरू करा, अन्यथा उपोषण’नाशिक : यंदाचा ऊस गाळप हंगाम ऑक्टोबर महिन्यापासून...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई...नांदेड ः प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालया...
वणी उपविभागातील शेतकऱ्यांना विमा...यवतमाळ : पीक विमा काढल्यानंतरही ही गेल्या तीन...
वाढीव वीज बिले कमी न केल्यास आंदोलन...सोलापूर  ः लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील...
बुलडाणा जिल्ह्यात शेततळ्यांचे अनुदान...बुलडाणा ः या वर्षात शेततळे खोदलेल्या शेतकऱ्यांना...
सोलापूर जिल्ह्यात उसावर ‘हुमणी’चा...सोलापूर  : जिल्ह्यात खरिपातील मूग, उडदावर...
राधानगरीतून २८०० क्युसेक विसर्गकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर...
सांगली जिल्ह्यात तुरीच्या पेरणी...सांगली : जिल्ह्यात गतवर्षी परतीचा झालेला पाऊस आणि...
मका बनले नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पीकयेवला : कांद्याचा अन् द्राक्षाचा जिल्हा अशी...
रत्नागिरीत मत्स्य शेतीकडे छोट्या...रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय विभागाला लाखोंचे...