नाशिकमध्ये लाल कांद्याच्या दरात सुधारणा कायम

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहामध्ये लाल पोळ कांद्याची आवक कमी होत आहे. आवक ३८६५ क्विंटल झाली.
 Red onion in Nashik Rate improvement continues
Red onion in Nashik Rate improvement continues

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहामध्ये लाल पोळ कांद्याची आवक कमी होत आहे.  आवक ३८६५  क्विंटल झाली. आवक कमी होऊन मागणी  वाढल्याने दरात सुधारणा कायम आहे. त्यास प्रतिक्विंटल १८०० ते ४३००, सरासरी दर ३५५० रुपये दर राहिला. 

लसणाची आवक ७३४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २४०० ते ६५०० तर सरासरी दर ४५५० रुपये राहिला. सध्या आवक वाढल्याने दर कमी  झाले आहेत. बटाट्याची आवक ८१९८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ८०० ते १४०० तर सरासरी दर ११५० रुपये राहिला. भाजीपाल्याच्या आवकेनुसार दरात चढ-उतार झाल्याचे पाहायला मिळाले. वालपापडी-घेवड्याची आवक ३४४७ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २००० ते ३७०० असा तर सरासरी दर २७०० रुपये राहिला. 

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला १०० ते २२५, तर सरासरी १५०, वांगी ९० ते २०० तर सरासरी १२५ व फ्लॉवर ७० ते २३१ सरासरी १४५ रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. तर कोबीला २० ते ६०, तर सरासरी ३५ रुपये दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला १२० ते २००, तर सरासरी दर १५५ रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले.

भोपळा ४० ते ३०० तर सरासरी १५०, कारले ३२५ ते ४७५ तर सरासरी ३७५, गिलके २०० ते ३८० तर सरासरी २६०,भेंडी २०० ते ४३० तर सरासरी ३५० व दोडका ३०० ते ५०० तर सरासरी दर ४५० रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले. 

द्राक्षाची आवक ५०६ क्विंटल झाली. थॉमसन  वाणास ८०० ते २०००, तर सरासरी १६०० रुपये दर मिळाला. शरद सीडलेस वाणास १२०० ते ३५०० तर सरासरी २६०० रुपये दर मिळाला. द्राक्षाच्या आवकेत व दरात घसरण झाली आहे. केळीची आवक ९०० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ४०० ते ९०० तर सरासरी दर ६५० रुपये मिळाला. डाळिंबाची आवक२९७  क्विंटल झाली. मृदुला वाणास १५०० ते १०००० तर सरासरी ७५०० रुपये दर मिळाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com