लाल कांद्याच्या दरात नाशिकमध्ये सुधारणा

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहामध्ये लाल कांद्याची आवक वाढली आहे. गत सप्ताहात आवक १६,४८६ क्विंटल झाली. आवकेसह मागणीवाढल्याने दरात सुधारणा दिसून आली.
 Red onion prices improve in Nashik
Red onion prices improve in Nashik

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहामध्ये लाल कांद्याची आवक वाढली आहे. गत सप्ताहात आवक १६,४८६ क्विंटल झाली. आवकेसह मागणी वाढल्याने दरात सुधारणा दिसून आली. त्यास प्रतिक्विंटल६०० ते २,६५० मिळाला. तर, सरासरी दर १,७०० रुपये राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार आवारात लसणाची आवक १९६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २,००० ते ६,००० तर सरासरी दर ४,००० रुपये राहिला. बटाट्याची आवक ९,७०२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते १,२००, तर सरासरी दर ७०० रुपये राहिला. आल्याची आवक ५१० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,००० ते २,००० तर सरासरी दर १,५०० रुपये राहिला.

सप्ताहात भाजीपाल्याच्या आवकेनुसार चढ-उतार झाल्याचे पाहायला मिळाले. वालपापडी-घेवड्याची आवक ६,३७३ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल २,००० ते ४,००० असा तर सरासरी दर ३,००० रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल १,८०० ते ३,२०० तर सरासरी दर २,५०० रुपये राहिला. हिरव्या मिरचीची आवक ९७४ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल ४,००० ते ५,००० रुपये, तर सरासरी दर ४,५०० रुपये मिळाला. वाटाण्याची आवक २,४४३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १५,०० ते २,००० तर सरासरी दर १५,०० रुपये राहिला. गाजराची आवक २,४२५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,००० ते २,०००, तर सरासरी दर १,५०० रुपये राहिला.

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला ५० ते ४००, तर सरासरी २७५, वांगी ७०० ते १,२००, तर सरासरी ८५०, फ्लॉवर १०० ते ३५०सरासरी २२५ रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. कोबीला १२० ते २५०, तर सरासरी १७५ रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला २५० ते ४५०, तर सरासरी दर ३५० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले.

वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा २५० ते ४००, तर सरासरी ३४०, कारले ४५० ते ६५०, तर सरासरी ५५०, गिलके ३०० ते ५००, तर सरासरी ४००, दोडका ४०० ते ७०० तर सरासरी दर ५०० रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले. 

फळांमध्ये केळीची आवक ८०० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ८०० ते १,२५० तर सरासरी दर १,००० रुपये मिळाला. डाळिंबाची आवक मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. अवघी ७२ क्विंटल झाली. मृदुला वाणास ४०० ते ८,०००, तर सरासरी ५,७५० रुपये दर मिळाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com