agriculture news in marathi, Red onion rate improvements | Agrowon

लाल कांद्याच्या दरात सुधारणा
टीम अॅग्रोवन
रविवार, 17 मार्च 2019

जळगाव : लाल कांद्याची जळगावसह धुळे, साक्री येथील बाजारासह मध्य प्रदेशातील इंदूर व बडवानी येथील बाजारातील आवक कमी होत आहे. यामुळे दरांचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी दर्जेदार कांद्याची पाठवणूक इंदूर, बडवानी येथील बाजारात करीत असल्याची माहिती आहे. 

जळगाव : लाल कांद्याची जळगावसह धुळे, साक्री येथील बाजारासह मध्य प्रदेशातील इंदूर व बडवानी येथील बाजारातील आवक कमी होत आहे. यामुळे दरांचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी दर्जेदार कांद्याची पाठवणूक इंदूर, बडवानी येथील बाजारात करीत असल्याची माहिती आहे. 

कांदा दर मागील महिन्यात दबावात होते. शहादा (जि. नंदुरबार) तालुक्‍यातील रायखेड, सुलतानपूर, आडगाव भागातील शेतकऱ्यांसह धुळे जिल्ह्यातील कापडणे, न्याहळोद, लामकानी, नेर भागांतील काही शेतकरी इंदूरच्या बाजाराला पसंती देत आहेत. जळगाव जिल्ह्यातील अडावद, धानोरा (ता. चोपडा), यावल तालुक्‍यातील डांभुर्णी, किनगाव भागांतील शेतकरीदेखील इंदूरच्या बाजारास पसंती देत आहेत. 

कांदा दरात जळगाव, धुळे, साक्री, पिंपळनेर, चाळीसगाव येथील बाजारात सुधारणा झाली. या आठवड्यात प्रतिक्विंटल किमान ३५० व कमाल ८५० रुपये दर मिळाले. जळगावमधील पांढऱ्या कांद्याची आवक जवळपास बंद झाली आहे. दोन ते तीन दिवसच पांढऱ्या कांद्याची आवक जळगाव व चाळीसगाव येथील बाजारात होते. त्याचे कमाल दर ९०० रुपयांपर्यंत आहेत. कांद्याला किमान १२०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाल्यास हे पीक परवडेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

इंदूर येथे चार-पाच शेतकरी मिळून एका ट्रकमधून १३ ते १५ मेट्रिक टन कांदा नेत आहेत. कारण यात वाहतूक खर्च व इतर खर्च कमी लागतो. शिवाय दर अपेक्षित न मिळाल्यास जोखीमही कमी होते. दर्जेदार कांद्याची तेथे मागील आठवड्यात सुमारे १००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत लिलावात विक्री झाली, अशी माहिती एका शेतकऱ्याने दिली.

इतर बाजारभाव बातम्या
परभणीत वांगी ८०० ते १५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात गवार प्रतिक्विंटल १२०० ते ६०००...जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये जळगाव ः कृषी...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
कळमणा बाजारात सोयाबीनची आवक आणि दर स्थिरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत शेतीमालाची...
गुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत बटाटे ८०० ते १००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत रताळी प्रतिक्विंटल १८०० ते २२००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कोथिंबीर प्रतिशेकडा ८०० ते ३५००...औरंगाबादेत प्रतिशेकडा ८०० ते ११०० रुपये औरंगाबाद...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ५००० ते ५९००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः नवती केळीच्या दरात मागील आठवडाभरात...
नाशिकमध्ये कोथिंबीर प्रतिक्विंटल ९,६००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
गुलटेकडीत शेवगा, मटार, कैरीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
करंजाड उपबाजारात टोमॅटो लिलावास सुरवातनाशिक : बागलाण तालुक्यातील करंजाड येथील उपबाजार...
औरंगाबादेत कोबी १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नारायणगाव उपबाजारात टोमॅटोची उच्चांकी...नारायणगाव, जि. पुणे   : जुन्नर कृषी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ८०० ते ३५००...नाशिकमध्ये प्रतिक्विंटल १००० ते २२५० रुपये नाशिक...
अकोल्यात मूग सरासरी ४४५० रुपये...अकोला ः गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे...
नाशिकमध्ये भुईमूग शेंगा प्रतिक्विंटल...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...