agriculture news in Marathi, red onion rates stable,jalgaon, maharashtra | Agrowon

जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकून
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 जुलै 2019

जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये लाल कांद्याची आवक रोडावली असून, जळगाव बाजार समितीत शनिवारी (ता. १३) फक्त ६०० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. दर ५५० ते १३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाले. दर मागील आठवडाभरापासून स्थिर आहेत.

जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये लाल कांद्याची आवक रोडावली असून, जळगाव बाजार समितीत शनिवारी (ता. १३) फक्त ६०० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. दर ५५० ते १३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाले. दर मागील आठवडाभरापासून स्थिर आहेत.

मागील आठवड्यात प्रतिदिन सरासरी ८०० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती. मागील वर्षी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात प्रतिदिन २८०० क्विंटलपर्यंतची आवक बाजारात झाली होती. मागील हंगाम किंवा मागील वर्षाच्या तुलनेत कांद्याची लागवड खानदेशात कमी झाली होती. धुळे, जळगावात मिळून सात ते आठ हजार हेक्‍टर लागवड अपेक्षित होती. परंतु, फक्त तीन हजार हेक्‍टरवर लागवड धुळे व जळगावात मिळून झाल्याचे सांगितले जात होते. 

परिणामी, बाजारात आवक सुरवातीपासून कमी आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दरात सुधारणा झाली होती. त्यापूर्वी दर किमान २५० व कमाल ८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. या महिन्यात कमाल दर १२०० रुपयांखाली गेलेले नाहीत. त्यात या आठवड्यात आणखी सुधारणा झाली असून, दर टिकून आहेत. आवक पुढे आणखी कमी होऊ शकते. कारण कमाल शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या लाल कांद्याची विक्री केली आहे. साठवणुकीची हवी तशी सुविधा नसल्याने कांद्याची जशी काढणी झाली, तशी विक्री अनेक शेतकऱ्यांनी केली होती. 

सध्या आवक जळगाव, यावल, भुसावळ व धुळे भागांतून होत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यातील आवकही कमी झाली आहे. मागील आठवड्यात प्रतिदिन सरासरी १२०० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती. जळगाव जिल्ह्यातील अडावद (ता. चोपडा), किनगाव (ता. यावल) येथील उपबाजारातही कांद्याची आवक रोडावली आहे. 

अडावद येथेही कांद्याचे कमाल दर १३५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत असल्याचे सांगण्यात आले. पांढऱ्या कांद्याची तर कुठलीही आवक होत नसल्याचे सांगण्यात आले. दर्जेदार लाल कांद्यास कमाल १४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर काही शेतकऱ्यांना जळगाव बाजार समितीत मागील शुक्रवारी (ता. १२) व शनिवारी मिळाला.

इतर ताज्या घडामोडी
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...
खानदेशात कापूस पिकात मर रोग, मूळकूजजळगाव ः खानदेशात जळगाव, धुळे व नंदुरबार...
...अन् नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले...मुंबई  ः कोणताही अन्याय सहन करायचा नाही, या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात केळी, नारळ, सुपारी... सिंधुदुर्ग  ः कुणी तीन लाख तर कुणी दोन...
राष्ट्रपतींनी घेतला सूतकताईचा अनुभववर्धा  ः राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
पीएच.डी.साठी गुरुवारी सामाईक प्रवेश...पुणे ः  राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील...
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-... भंडारा  ः विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस...
कोयना धरणातून ६७ टीएमसी पाण्याचा विसर्गसातारा : या महिन्याच्या सुरवातीपासून मुसळधार...
मराठवाड्यात पाणीसाठ्याची स्थिती विदारकऔरंगाबाद : अर्धा पावसाळा लोटला तरीही मराठवाड्यात...
बुलडाणा जिल्ह्यात निर्माण झाली १३२५...बुलडाणाः जिल्हा प्रशासन व भारतीय जैन संघटना...
कोकणात नुकसानभरपाईचे वेगळे निकष लावा :...रत्नागिरी : ‘‘सांगली, कोल्हापूरप्रमाणेच कोकणातील...
सिंधुदुर्गात अतिवृष्टीने महावितरणचे चार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि...
शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर...जालना : सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खतांचा...
परभणी जिल्ह्यात पाण्याअभावी फळबाग...परभणी : जिल्ह्यात गतवर्षीची दुष्काळी स्थिती आणि...
औरंगाबादेत कांदे १००० ते १६०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावच्या पश्‍चिम भागातील प्रकल्प कोरडेचजळगाव ः खानदेशात अनेक भागांत पाऊसमान चांगले असले...
प्रौढांपेक्षा अळ्यांच्या वेगळ्या...गेल्या काही वर्षांमध्ये हानीकारक ठरणाऱ्या किडी...