लासलगावात लाल कांदा प्रतिक्विंटल ३०० ते १५४० रुपये

लासलगावात लाल कांदा प्रतिक्विंटल ३०० ते १५४० रुपये
लासलगावात लाल कांदा प्रतिक्विंटल ३०० ते १५४० रुपये

लासलगाव : गतसप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची ३९,७७१ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रुपये १५१ कमाल रुपये ७५३, तर सर्वसाधारण रुपये ३६२ तर लाल कांद्याची ३१,०३५ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रुपये ३०० कमाल रुपये १,५४० तर सर्वसाधारण रुपये १,०८७ प्रतिक्विंटल राहिले.

लासलगाव मुख्य बाजार आवारावरील भुसार व तेलबिया शेतीमालाचे प्रतिक्विंटल बाजारभाव पुढीलप्रमाणे होते : गहू ३८७ क्विंटल भाव १,९५१ ते २,८१७ सरासरी २,२७१ रुपये, बाजरी लोकल १०० क्विंटल भाव १,४०० ते २,२७१ सरासरी २,१०१ रुपये, बाजरी हायब्रीड २८ क्विंटल भाव १,३८२ ते १,५८० सरासरी १,४६७ रुपये, ज्वारी लोकल १० क्विंटल भाव १,७०१ ते १,७०१ सरासरी १,७०१ रुपये, हरभरा लोकल १०९ क्विंटल भाव ३,००० ते ४,४९० सरासरी ४,११३ रुपये, हरभरा विशाल १७ क्विंटल भाव ४,००० ते ४,७५२ सरासरी ४,३७१ रुपये, हरभरा काबुली १४८ क्विंटल भाव ३,४०० ते ४,६०० सरासरी ४,१६३ रुपये, सोयाबीन १,८०२ क्विंटल भाव ३,००० ते ३,३६१ सरासरी ३,३१५ रुपये, मका ३४,७८५ क्विंटल भाव १,२०१ ते १,५८४ सरासरी १,५३६ रुपये, मुग ८० क्विंटल भाव ३,५०० ते ६,३५२ सरासरी ५,४२६ रुपये, उडीद ४२ क्विंटल भाव ३,८०० ते ४,६५२ सरासरी ४,४४७ रुपये प्रतिक्विंटल राहिले.

निफाड उपबाजार आवारावरील आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे होते : उन्हाळ कांदा ३,९२४ क्विंटल भाव रुपये १०० ते ५२१ सरासरी रुपये २८०, सोयाबीन १,१३९ क्विंटल २,५०० ते ३,३५१ सरासरी ३,२९० रुपये, गहू १६९ क्विंटल भाव १,९०० ते २,७०० सरासरी २,३०० रुपये, मका ५४७९ क्विंटल भाव १,२८० ते १,६०१ सरासरी १,४७० रुपये, हरभरा लोकल ५० क्विंटल भाव २,७०० ते ४,४०१ सरासरी ४,२५१ रुपये प्रतिक्विंटल राहिले.

विंचूर उपबाजार आवारावरील आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे होते : उन्हाळ कांदा २३,८५९ क्विंटल भाव रुपये २०१ ते ७३० सरासरी रुपये ३५०, लाल कांदा ५,२६३ क्विंटल भाव रुपये ३०० ते १,३७६ सरासरी रुपये १,०५०, गहू ११८ क्विंटल १,३०० ते २,४५१ सरासरी २,१०० रुपये, सोयाबीन २,६११ क्विंटल २,००० ते ३,४६१ सरासरी ३,२०० रुपये, मूग ०८ क्विंटल ४,३११ ते ५,६०० सरासरी ५,००० रुपये, मका १७,९१५ क्विंटल १,१५२ ते १,६०७ सरासरी १,४७० रुपये, बाजरी  १० क्विंटल भाव १,५५२ ते २,१५१ सरासरी १,७५० रुपये, हरभरा लोकल ८९ क्विंटल भाव ३,४३१ ते ५,००१ सरासरी ४,२०० रुपये प्रतिक्विंटल राहिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com