agriculture news in marathi, red on Ratnagiri fertilizer factory | Agrowon

रत्नागिरीत खतनिर्मिती कारखान्यावर छापा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 20 जून 2019

रत्नागिरी : येथील एमआयडीसी परिसरात मच्छीच्या कुटीवर प्रक्रिया करून विनापरवाना खतनिर्मिती करणाऱ्या कारखान्यावर कृषी विभागाच्या पथकाने बुधवारी (ता. १९) कारवाई केली. खताच्या पिशवीवर नमूद केलेले घटक पिशवीत घेण्यात आले नाहीत. ते खत बोगस आहे, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

रत्नागिरी : येथील एमआयडीसी परिसरात मच्छीच्या कुटीवर प्रक्रिया करून विनापरवाना खतनिर्मिती करणाऱ्या कारखान्यावर कृषी विभागाच्या पथकाने बुधवारी (ता. १९) कारवाई केली. खताच्या पिशवीवर नमूद केलेले घटक पिशवीत घेण्यात आले नाहीत. ते खत बोगस आहे, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

कारखान्यातील सहा हजार पिशव्या जप्त केल्या असून त्याची किंमत सुमारे ३५ लाख रुपयांपर्यंत आहे. ही कारवाई कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय पथकामार्फत करण्यात आली. संबंधित कारखानदाराविरोधत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पावसाळ्यात शेतकऱ्यांना खताची गरज भासते. याचा लाभ उठवून सेंद्रीय खताच्या नावाखाली बोगस खताची विक्री केली जाते. रत्नागिरी शहराजवळ मिरजोळे एमआयडीसीत अ‍ॅबीशिअस फिश मिलमध्ये बोगस सेंद्रीय खताची निर्मिती गेले काही दिवस सुरु आहे.

मंगळवारी (ता. १८) राजापूर तालुक्यातील केळशी येथे एका विक्री केंद्रात हे बोगस खत विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. ही बाब कृषी पर्यवेक्षकाच्या निदर्शनास आल्यानंतर जिल्हास्तरीय पथकाने ते खत जप्त केले. तसेच कारखान्यावर धाड टाकली. जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी आरिफ शहा, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक जी. आर. मुरकुटे, विनोद हेगडे, विशाल जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हा कारखाना सिराज काझी यांच्या मालकीचा आहे. मच्छी कुजवून त्यात सोयाबीन टाकून सेंद्रीय खत तयार केले जाते. शंभरटक्के विघटनशील सेंद्रीय खत म्हणून प्रेटीनयुक्त सुपिका या नावाने खताची विक्री केली जात आहे. सुमारे चाळीस किलो वजनाचे पोते ५५० रुपयाला विकले जाते. याच ठिकाणी २००६ ते ०९ सीटी कंपोस्ट खताची निर्मिती होत होती; परंतु २००९ मध्ये परवाना संपल्यानंतर काझी यांनी प्रोटीनयुक्त सुपिका खतनिर्मितीला सुरवात केली. त्यासाठीचा आवश्यक कोणताही परवाना शासनाकडून घेतला नाही. हा कारखाना सील करण्यात आला असून ग्रामीण पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असल्याचे शहा यांनी सांगितले. 

इतर बातम्या
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८...नांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...