दुष्काळी जमिनीला कष्टामुळे चढली स्ट्रॉबेरीची लाली 

सिन्नर तालुका म्हटला, की दुष्काळी तालुका अशी बऱ्याच वर्षांपासूनची ओळख आहे. कमी पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु हे चित्र नव्या पिढीने प्रयोगशीलतेने बदलवले आहे.
The redness of strawberries hardened the drought-stricken land
The redness of strawberries hardened the drought-stricken land

सिन्नर, जि. नाशिक : सिन्नर तालुका म्हटला, की दुष्काळी तालुका अशी बऱ्याच वर्षांपासूनची ओळख आहे. कमी पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु हे चित्र नव्या पिढीने प्रयोगशीलतेने बदलवले आहे. तालुक्यातील सोनांबे येथील युवा शेतकरी विकास नंदू पवार याने प्रतिकूल हवामानावर मात करत २५ गुंठे क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड यशस्वी करून उत्पन्न मिळवले आहे. 

विकास याने विज्ञान शाखेतील वनस्पतिशास्त्र या विषयात पदवी घेतल्यानंतर लॉकडाउन काळात शेतीकडे लक्ष दिले. त्यात अनेक नवीन प्रयोग हाती घेतले. स्ट्रॉबेरीचे आगार असलेल्या महाबळेश्‍वर येथील प्रगतिशील शेतकरी विजय नन्नावरे यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. पिकाच्या लागवडीच्या व्यवस्थापनाचा अभ्यास केल्यानंतर सप्टेंबर महिन्यात लागवड केली. यानंतर दोन महिन्यांनी हंगाम होऊन तो मार्चअखेर चालला. फळे तयार होऊन साधारण दिवसाआड तोडणी सुरू केली. हंगामात साडेपाच टन उत्पादन हाती आले आहे. 

सोनांबे हे घोटी रोडलगत असल्याने तसेच समृद्धी महामार्गाचे कामही याच परिसरात सुरू असल्याने स्ट्राॅबेरीची थेट विक्री झाली. हंगामाच्या सुरुवातीला प्रति किलोस २५० ते ३०० रुपये असा उच्चांकी दर, तर नंतर १०० ते २५० प्रति किलो असा दर मिळाला. साधारण चार ते पाच महिन्यांच्या कालावधीत आपल्याला ६ लाखांच्या आसपास उत्पन्न मिळाले आहे. 

आलेला खर्च असा  मल्चिंग पेपर, खते, फवारणी, पॅकींग बाॅक्स यासाठी एकूण खर्च : १ लाख २५ हजार 

हंगाम तीन ते चार महिने सुरू राहून त्यात ५ टन उत्पादन अपेक्षित आहे. उत्पादन खर्च जाऊन तीन लाख रुपये नफा मिळेल. पीक व्यवस्थापन केल्यास गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळाले.  - विकास नंदू पवार, तरुण शेतकरी   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com