agriculture news in marathi Reduce the cost of cotton production Need to do: Dr. Dhawan | Agrowon

कपाशीचा उत्पादन खर्च कमी करण्याची गरज ः डॉ. ढवण

टीम अॅग्रोवन
रविवार, 28 फेब्रुवारी 2021

नांदेड ः ‘‘जगाच्या तुलनेत आपल्या देशात कपाशीची उत्पादकता कमी आहे. यामुळे कपाशीच्या उत्पादनवाढीसह त्याचा उत्पादन खर्च कमी करण्याची गरज आहे.’’

नांदेड ः ‘‘जगाच्या तुलनेत आपल्या देशात कपाशीची उत्पादकता कमी आहे. यामुळे कपाशीच्या उत्पादनवाढीसह त्याचा उत्पादन खर्च कमी करण्याची गरज आहे,’’ असे प्रतिपादन परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.

नांदेड कापूस संशोधन केंद्रात शुक्रवारी (ता.२६) कृषी विद्यापीठ व कृषी विभागातर्फे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कापूस उत्पादन वृद्धी कार्यशाळा कीटकनाशक प्रतिकारक्षमता व्यवस्थापन व प्रथमदर्शनी पीक प्रात्यक्षिक योजनेअंतर्गत निविष्ठा वाटप व शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. त्याच्या प्रारंभप्रसंगी डॉ. ढवण बोलत होते. केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, राज्याचे कृषी संचालक विकास पाटील, कृषी शास्त्रज्ञ डॉ. वेणुगोपाल, डॉ. बालसुब्रमण्यम, कृषी सहसंचालक पांडुरंग शिगेदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे आदी उपस्थित होते.

डॉ. धवण म्हणाले, ‘‘कापूस महाराष्ट्रातील प्रमुख पीक आहे. देशाच्या तुलनेत 33 टक्के क्षेत्रावर कपाशीची लागवड होते. उत्पादनवाढीसाठी क्षेत्र वाढ आवश्यक आहे. लागवडीपासून ते काढणीपर्यंत एकात्मिक व एकत्रित पद्धतीने संगोपन केल्यास यात वाढ होईल.’’ 

कापूस संशोधन केंद्राचे प्रमुख खीजर बेग यांनी प्रास्ताविक केले. पाटील, डॉ. प्रसाद, डॉ. वासकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. धनेगाव येथील कापूस संशोधन प्रक्षेत्रावर उपस्थितांनी भेट दिली. या प्रसंगी शेतकऱ्यांना निविष्ठेचे वाटप करण्यात आले. 

डॉ. ढवण यांनी ‘ॲग्रोवन’च्या विस्तार कार्यातील सहभागाबाबत गौरवपूर्ण उल्लेख केला. कृषी शास्त्रज्ञ संशोधनासोबत विस्तार कार्यही करतात. यात ‘ॲग्रोवन’ कृषी विद्यापीठाच्या हातात हात घालून काम करत आहे. प्रत्येक जिल्ह्यात ‘अग्रोवन’चा विस्तार आहे. त्यामुळे विस्ताराचे कार्य एकत्रित सुरू आहे, असे ते म्हणाले.


इतर ताज्या घडामोडी
नांदेडमध्ये ४२ हजार ६४९ क्विंटल हरभरा...नांदेड : जिल्ह्यात किमान हमी दरानुसार सुरू...
व्हर्च्युअल क्लासरूममुळे कृषी शिक्षणाची...नगर ः व्हर्च्युअल क्लासरूम आणि अॅग्री-दीक्षा वेब...
‘एमआरपी’नुसारच खतांची खरेदी करावी सोलापूर ः यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर...
खरीप हंगामासाठी ११४० कोटी रुपये पीककर्ज...अकोला : अकोला जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी ११४०...
सटाणा बाजार समिती आवाराबाहेर अवैध...नाशिक : सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही...
नाशिक जिल्ह्यात विहिरींनी गाठला तळ नाशिक : जिल्ह्यात गत मॉन्सूनमध्ये अनेक भागांत...
भोकरखेडात चार वर्षांपासून शेतकरी वीज...वाशीम : शेतात वीज जोडणी घेऊन सिंचन करता येईल....
टेंभू योजनेचे पाणी सोडले; ‘बंदिस्त पाइप...आटपाडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्‍यात टेंभू...
प्रत्येक गावाचा होणार कृषी विस्तार...जालना : कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामाचे...
तमाशा कलावंतांसाठी सरसावले मदतीचे हात नगर ः : कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे टाळेबंदी...
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत चुरस सोलापूर ः पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा...
कांदा बाजारावर ‘कोरोना’चा परिणाम नगर : कोरोना व्हायरसची बाधा वाढत असल्याचा बाजार...
महाराष्ट्राला रेमडिसिव्हिर देण्यास ‘...मुंबई : केंद्र सरकारकडून रेमडिसिव्हिर निर्यातीवर...
डाळिंब सल्लाहस्त बहर उशिरा घेतला असेल तर फळांना बटर पेपर बॅग...
कृषी सल्ला : आंबा, काजू, नारळ, सुपारीनवीन आंबा लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील...
कृषी सल्ला : सुरु ऊस, कांदा, फळपिकेवातावरणातील उष्णता वाढल्यामुळे जनावरांच्या...
राज्यात उष्ण, ढगाळ हवामानसोमवार ते बुधवारपर्यंत (ता.१९ ते २१) १००८...
नांदेड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी वसंत...नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
देशात ‘जमीन सुपोषन व संरक्षण जनजागरण’...औरंगाबाद : संपूर्ण देशभरात मंगळवारपासून (ता. १३...
निराधार महिला शेतकऱ्यांसाठी ‘ट्रँक्टर...अमरावती : अचलपूर विधानसभा मतदारसंघातील निराधार,...