Agriculture news in Marathi, Reduced arrival of guar, tomato, flower in Pune; Increase in rates | Agrowon

पुण्यात गवार, टोमॅटो, फ्लॉवरची आवक कमी; दरात वाढ

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २९) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली होती. तीन ते चार दिवसांपूर्वी झालेल्या पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे भिजलेल्या फुलांची आवक वाढली होती. तर भाजीपाल्यामधील आवक स्थिर होती. नवरात्रीमुळे रताळ्याबरोबर फळांची आवक वाढली झाली होती. पालेभाज्यामध्ये कोथिंबिरीची सुमारे ३ लाख, तर मेथीची सुमारे ८० हजार जुड्यांची आवक झाली होती. तर गवार, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी आणि मटारच्या आवकेत घट झाल्याने दरात वाढ झाली होती. कांद्याचे दर स्थिर होते. 

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २९) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली होती. तीन ते चार दिवसांपूर्वी झालेल्या पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे भिजलेल्या फुलांची आवक वाढली होती. तर भाजीपाल्यामधील आवक स्थिर होती. नवरात्रीमुळे रताळ्याबरोबर फळांची आवक वाढली झाली होती. पालेभाज्यामध्ये कोथिंबिरीची सुमारे ३ लाख, तर मेथीची सुमारे ८० हजार जुड्यांची आवक झाली होती. तर गवार, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी आणि मटारच्या आवकेत घट झाल्याने दरात वाढ झाली होती. कांद्याचे दर स्थिर होते. 

विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतील बंगळूर येथून आले १ टेम्पो, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, गुजरात आणि कर्नाटक येथून सुमारे १५ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक आणि गुजरात येथून ३ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा सुमारे ४ टेम्पो, इंदूर येथून गाजर सुमारे २ टेम्पो, कर्नाटकातून घेवडा सुमारे २ टेम्पो, कर्नाटक येथून भुईमूग सुमारे ४ टेम्पो, बेळगाव येथून रताळी सुमारे १ हजार गोणी, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ६ हजार गोणी, तर आग्रा आणि इंदूर येथून बटाटा सुमारे ४० ट्रक आवक झाली होती. 

महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार गोणी, टॉमेटो सुमारे ४ हजार क्रेट, गाजर ३ टेम्पो, फ्लॉवर, कोबी, सिमला मिरची, तांबडा भोपळा (डांगर) भेंडी प्रत्येकी सुमारे ८ ते १० टेम्पो, गवार सुमारे ६ टेम्पो, मटार अवघी ६० गोणी, भुईमूग शेंग सुमारे ३ टेम्पो, हिरवी मिरची ४ टेम्पो, काकडी १० ते १२ टेम्पो, कराड, मलकापूर भागातून रताळी सुमारे दीड हजार गोणी, तसेच कांदा सुमारे ६० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : 
कांदा : ३५०-४००, बटाटा : ८०-१५०, लसूण : १२००-१८००, आले : सातारी ५००-६५०, बंगळूर २५०-३००, भेंडी : २५०-३००, गवार : ३००-५००, टोमॅटो : १८०-२५०, दोडका : २५०-३००, हिरवी मिरची : १८०-२००, दुधी भोपळा : ८०-१२०, चवळी : १५०-२००, काकडी : ८०-१२०, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी २००-२२०, पापडी : २००-२५०, पडवळ : २४०-२५०, फ्लॉवर : १५०-२००, कोबी : १००-१५०, वांगी : २००-३००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १२०-१४०, ढोबळी मिरची : २५०-३००, तोंडली : कळी २५०-३००, जाड : १५०-१६०, शेवगा : ३००-४००, गाजर : २५०-३००, वालवर : २५०-३००, बीट : १४०-१६०, घेवडा : ४००-६००, कोहळा : १००-१५०, आर्वी : ३००-३५०, घोसावळे : २००-२२०, ढेमसे : २००-२५०, पावटा : २००-२५०, भुईमूग शेंग : ५००- ५५०, मटार : १३००-१५००, तांबडा भोपळा : ८०-१२०, सुरण : २३०-२५०, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्या 
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ५०० -१०००, मेथी : ५००-८००, शेपू : ४००-७००, कांदापात : १२०० -१८००, चाकवत : ५०० -८००, करडई : ५०० -७००, पुदिना : २०० -३००, अंबाडी : ६००-८००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ५०० -८००, चुका : ८००-१०००, चवळई : ५०० -६००, पालक : ४०० -६००.

फुलबाजार
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-३०, गुलछडी : १८०-२५०, बिजली : ४०-७०, कापरी : ४०-८०, शेवंती : ४०-१००, अ‍ॅस्टर : १५-२०, (गड्ड्यांचे भाव) गुलाब गड्डी : २०-४०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ५०-८०, लिली बंडल : १६-२५, जरबेरा : २०-४०, कार्नेशियन : ८०-१२०.

फळबाजार 
रविवारी (ता. २९) मोसंबी सुमारे ७० टन, संत्री १० टन, डाळिंब २५० टन, पपई सुमारे २५ टेम्पो, लिंबे सुमारे दीड हजार गोणी, चिकू २ हजार गोणी आणि बॉक्स, कलिंगड २० तर खरबूज ५ टेम्पो, पेरू सुमारे ३०० क्रेट, तर सीताफळाची सुमारे ५ टन आवक झाली होती. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : 
लिंबे (प्रति गोणी) : ७००-११००, मोसंबी : (३ डझन) : १८०-४५०, (४ डझन) : ९०-२२०, संत्रा : (३ डझन) : १५०-३००,  (डझन ४) : ६०-१५०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-१५० गणेश १०-४०, आरक्ता २०-५०. कलिंगड : ५-१२ खरबूज : १०-३०, पपई : ८-३०, चिकू : १००-८००, पेरू (२० किलो) ८००-१२००. 

मटण-मासळी 
गणेश पेठ येथील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता. २९) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ५ टन, खाडीची सुमारे २०० किलो तर नदीच्या मासळीची १५० किलो आवक झाली होती. तर आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे ५ टन आवक झाली होती. दरम्यान नवरात्र उत्सवामुळे मासळी, मटण चिकनची मागणी अभावी आवक घटली होती. मागणी आणि आवक स्थिर असल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत मासळी, मटण, चिकन आणि अंडीचे स्थिर होते.

खोल समुद्रातील मासळी 
(प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १४००-१५००, मोठे १४००-१५००, मध्यम : ८००-९००, लहान ६००-६५०, भिला : ४००-४५०, हलवा : ४८०-५५०, सुरमई : ४८०-५५०, रावस : ४८०-५५०, घोळ : ५५०, भिंग : ३२०, करली : २८०, करंदी : सोलली ३६०, पाला : लहान ७००-८०० मोठा १०००, वाम : पिवेळो लहान  ५५०, मोठेही ६००-७००, ओले बोंबील : ८०-१००. 

कोळंबी 
लहान १४०-१६० मोठी ३६०-४००, जंबो प्रॉन्स : १३००-१३००, किंग प्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १२००-१३००, मोरी : लहान -२०० मोठी २८०, मांदेली : १२०, राणीमासा : १६०-२००, खेकडे : १६०-२००, चिंबोऱ्या : ४८०.

खाडीची मासळी 
सौंदाळे : २००-२४०, खापी : १६०-२००, नगली : लहान ३६० मोठी ४८०-५५०, तांबोशी : ४००- ४४०, पालू : २४०, लेपा : लहान १२०-१४० मोठे २००, शेवटे : २००, बांगडा : लहान १४०-१६० मोठे २२०-२४०, पेडवी : ८०, बेळुंजी : १४०-१६०, तिसऱ्या : १६०-२००, खुबे : १२०, तारली : १४०-१६०.

नदीची मासळी 
रहू : १४०, कतला : १४०, मरळ : २८०, शिवडा : १६०-१८०, चिलापी : ६०, खवली : १६०, आम्ळी : ८०, खेकडे : १६०, वाम : ४८०

मटण 
बोकडाचे : ५००, बोल्हाईचे : ५००, खिमा : ५००, कलेजी : ५६०.

चिकन 
चिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०.

अंडी 
गावरान : शेकडा : ७३० डझन : ९६ प्रति नग : ८. इंग्लिश : शेकडा : ४५२ डझन : ६० प्रतिनग : ५.  
 


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...