खानदेशातील प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग घटविला

खानदेशातील प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग घटविला
खानदेशातील प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग घटविला

जळगाव : खानदेशात पावसाचा फारसा जोर नसल्याने प्रमुख प्रकल्प व मध्यम प्रकल्पांमधील विसर्ग घटत आहे. तसेच अपूर्ण भरलेल्या प्रकल्पांमधील आवकदेखील कमालीची घटली आहे. यामुळे कुठेही पूरस्थिती नसल्याचे चित्र आहे. 

चाळीसगाव, पाचोरा, एरंडोल भागांत मागील सोमवारी (ता. २) व मंगळवारी (ता. ३) जोरदार पाऊस झाला होता. यामुळे या भागातील अनेक लघुप्रकल्प, तलाव भरले. तसेच गिरणा नदीलादेखील प्रवाही पाणी आले होते. परंतु मागील दोन-तीन दिवसांपासून गिरणा व वाघूर नदीच्या लाभक्षेत्रात पाऊस नसल्याने या नद्यांमधील पाण्याचा प्रवाह घटला आहे.

सातपुडा पर्वतातही पावसाचा जोर कमी असल्याने जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्‍यातील गूळ व यावल तालुक्‍यातील मोर प्रकल्पाच्या सांडव्यातील विसर्ग कमी झाला आहे. गूळ नदीमधील पाण्याचा प्रवाहदेखील कमी झाला आहे. रावेर तालुक्‍यातील सुकी, भोकरी नदीमधील पाण्याचा प्रवाहदेखील कमी झाला आहे. गारबर्डी प्रकल्पाच्या सांडव्यातील विसर्गदेखील घटला आहे.

मुक्ताईनगरनजीकच्या तापी नदीवरील हतनूर प्रकल्पाचे १२ दरवाजे गुरुवारी (ता. ५) सकाळी उघडे होते. तर शुक्रवारी (ता. ६) सहा दरवाजे पूर्ण उघडे होते. 

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्‍यात मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरूच आहे. परंतु पांझरा प्रकल्पातील विसर्ग कमी झाला आहे. त्यातून कालव्यांमध्ये पाणी सोडण्यात आले आहे. नदीमधील पाण्याचा विसर्ग घटला आहे. शिरपूर तालुक्‍यातील अनेर प्रकल्पाचे दोन दरवाजे सध्या उघडे आहेत. मध्यंतरी या प्रकल्पाचे १० दरवाजे उघडे होते.

पावसाचा जोर या भागात कमी झाल्यानंतर विसर्ग कमी केला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील रंगावली प्रकल्प, सुसरी या प्रकल्पातून विसर्ग सुरू असला तरी तो मागील तीन-चार दिवसांत कमी झाला आहे. नदीला पूरस्थिती नसल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com