agriculture news in marathi, Reduction of cow milk milk procurement rate outside the area of ​​Gokul | Agrowon

‘गोकुळ’ची कार्यक्षेत्राबाहेरील गायीच्या दूध खरेदी दरात कपात
टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 जून 2018

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघांने (गोकुळ) कार्यक्षेत्राबाहेरील दूध दरात लिटरला एक रुपया कपात केली आहे. कार्यक्षेत्राबाहेरून म्हशीपेक्षा गायीचे दूध जास्त येऊ लागल्याने हा निर्णय घेतल्याचे संघाने स्पष्ट केले आहे. कार्यक्षेत्रातील गायीचे दूध खरेदी दरात मात्र कपात करण्यात आली नाही. कार्यक्षेत्राबाहेर गायीचे दूध २१ रुपये लिटरप्रमाणे खरेदी केले जात होते. आता ते २० रुपयांप्रमाणे खरेदी केले जाणार आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघांने (गोकुळ) कार्यक्षेत्राबाहेरील दूध दरात लिटरला एक रुपया कपात केली आहे. कार्यक्षेत्राबाहेरून म्हशीपेक्षा गायीचे दूध जास्त येऊ लागल्याने हा निर्णय घेतल्याचे संघाने स्पष्ट केले आहे. कार्यक्षेत्रातील गायीचे दूध खरेदी दरात मात्र कपात करण्यात आली नाही. कार्यक्षेत्राबाहेर गायीचे दूध २१ रुपये लिटरप्रमाणे खरेदी केले जात होते. आता ते २० रुपयांप्रमाणे खरेदी केले जाणार आहे.

संघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून गायीच्या दुधाच्या विक्रीत सर्वच संघांना अडचणी येत आहेत. पावडरीला दर नसल्याने पावडर करणे शक्‍य नसल्याने गायीच्या दुधाला अनेक दूध संघ नापसंती दाखवत आहेत. पंधरवड्यापूर्वी स्वाभिमानी दूध संघाने गायीचे अतिरिक्त दूध न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ) व्यावसायिक धोरण स्वीकारण्याबाबत हालचाली सुरू केल्या. यातून कार्यक्षेत्राबाहेरील गायीच्या दुधाचे प्रमाण वाढत असल्याचे निर्दशनास आले. गायीचे दूध म्हशीच्या दुधापेक्षा साठ टक्के जास्त येत असल्याने दूध संघाने या दूध दरात कपात केली आहे.

कार्यक्षेत्राबाहेरील संघानी ७०:३० या प्रमाणात म्हैस व गायीचे दूध घालावे, अशी सूचना संघाने दुग्धसंस्थांना केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक संस्था, व्यापारी म्हशीचे दूध अन्य ठिकाणी विक्री करून फक्त गायीचे दूधच गोकुळला देत होते. हा प्रकार बंद करण्यासाठी गायीच्या दूध दरात कपात केल्याचे संघाचे व्यवस्थापक डी. व्ही. घाणेकर यांनी सांगितले.

७० टक्के म्हशीचे, तर ३० टक्के गायीचे दूध स्वीकारण्याचे नियोजन

सध्या कार्यक्षेत्राबाहेरील गाय व दुधाचे प्रमाण तपासण्याचे काम सुरू आहे. ज्या भागातून गायीचे दूध जास्त येत आहे त्यांना गायीचे दूध कमी करून म्हशीचे दूध वाढवावे, अशी सूचना करण्यात येत आहे. येथून पुढे ७० टक्के म्हशीचे, तर ३० टक्के दूध गायीचे अशा प्रमाणात दूध स्वीकारण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे संघाच्या दूध संकलन विभागातून सांगण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...
पक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर  : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...
पुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...
‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर  ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...
जनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई  : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...
भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा   ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...
अमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती   ः जिल्ह्यातील चौदाही...
समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती  : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...