साताऱ्यात दीड लाख लिटरने दूध संकलन घटले 
साताऱ्यात दीड लाख लिटरने दूध संकलन घटले 

साताऱ्यात दीड लाख लिटरने दूध संकलन घटले 

सातारा : जिल्ह्याच्या अनेक भागात पाणी टंचाई भीषण होऊ लागली आहे. या टंचाईमुळे परिणाम जनावरांच्या चाऱ्यावर होऊ लागल्याने जिल्ह्यातील दूध उत्पादनात घट झाली आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत एक लाख ४८ हजार ४०० लिटर घट झाली आहे. याचा परिणाम  जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणी टंचाईचे संकट तीव्र झाले आहे. 

यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांसह जनावरांना टँकरच्या पाण्यावर अंवलबून रहावे लागत आहेत. जनावरांसाठी चाऱ्यासाठी पशुवैद्यकीय विभागाकडून चारा निर्मितीवर भर देण्यात आला आहे. मात्र, तीव्र उन्हाळ्यात ओला चारा मिळत नसल्याने दुधाच्या उत्पादनात घट झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक दूध संकलन खासगी संस्थांकडून केले जात आहे. यानंतर सहकारी व शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून दूध संकलन केले जात आहे.

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यांत प्रतिदिन १६ लाख ६३ हजार ८०० लिटरवर दूध संकलन होत होते. सध्या प्रतिदिन १८ लाख १२ हजार २०० लिटर संकलन होत आहे. चारा, पाणी टंचाईचे संकट वाढल्याने दुधाच्या उत्पादनात घट झाली आहे. फेब्रुवारीच्या महिन्यात तुलनेत एक ४८ हजार ४०० लिटर संकलनाता घट झाली आहे. एकूण घटीपैकी ४३ हजार लिटर दूध जिल्ह्यातून तर एक लाख पाच हजार ४०० लिटर दुध इतर जिल्ह्यात घट झाली आहे. जिल्ह्यातून चारा व पाणी टंचाईचा परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होऊन उत्पादनात होत आहे. एकुण संकलन दूध संकलनापैकी सर्वाधिक दूध पावडर निर्मितीसाठी जात आहे.

एकही छावणी नाही चारा पाणीटंचाईमुळे जनावरे संभाळणे सद्यःपरिस्थितीत जनावरांची परिस्थिती हालाखीची होत आहे. दुष्काळाच्या भीषण संकटातून बाहेर काढण्यासाठी जनावरे जगविण्यासाठी छावण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मात्र, म्हसवड येथे माणदेशी फाउंडेशनचा अपवाद वगळता एकही छावणी सुरू झालेली नाही.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com