agriculture news in Marathi, Reduction in milk production of Marathwada is 10 thousand liters | Agrowon

मराठवाड्यातील दूध संकलनात दहा हजार लिटरची घट

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 मार्च 2019

औरंगाबाद : आजवर तग धरून असलेल्या मराठवाड्यातील दुधाच्या संकलनात घट सुरू झाली आहे. जानेवारी अखेरच्या तुलनेत फेब्रुवारीअखेर मराठवाड्यातील शासकीय, सहकारी व खासगी डेअऱ्यांच्या दूध संकलनात जवळपास दहा हजार लिटरची प्रतिदिन घट नोंदली गेली आहे. 

औरंगाबाद : आजवर तग धरून असलेल्या मराठवाड्यातील दुधाच्या संकलनात घट सुरू झाली आहे. जानेवारी अखेरच्या तुलनेत फेब्रुवारीअखेर मराठवाड्यातील शासकीय, सहकारी व खासगी डेअऱ्यांच्या दूध संकलनात जवळपास दहा हजार लिटरची प्रतिदिन घट नोंदली गेली आहे. 

दुष्काळाच्या झळा आता अशा संकटसमयी तारणहार बनणाऱ्या दूध व्यवसायालाही बसत असल्याचे दुधाच्या झालेल्या घटीवरून स्पष्ट झाले आहे. प्राप्त माहितीनुसार मराठवाड्यात जानेवारी २०१९ अखेर दरदिवशी ११ लाख २२ हजार लिटर दुधाचे संकलन केले जात होते ते फेब्रुवारीअखेर ११ लाख १२ हजार लिटर प्रतिदिनवर आले आहे. जानेवारी अखेर प्रतिदिन संकलीत केल्या जाणाऱ्या दुधामध्ये शासनाच्या दूध संकलानाचा वाटात १ लाख ४७ हजार लिटर, सहकारी डेअऱ्यांचा वाटा २ लाख ७६ हजार लिटर तर खासगी डेअऱ्यांचा वाटा ६ लाख ९९ हजार लिटर इतका होता. 

फेब्रुवारी अखेरच्या अहवालानुसार शासनाचे दूध संकलन प्रतिदिन १ लाख ५६ हजार लिटरवर पोचले आहे. दुसरीकडे सहकारी डेअऱ्यांचे प्रतिदिन दूध संकलन मागच्या महिन्याच्या तुलनेत वाढून २ लाख ८० हजार  लिटर प्रतिदिनवर पोचले. खासगी डेअऱ्यांच्या दूध संकलनात मात्र जानेवारी अखेरच्या तुलनेत फेब्रुवारी अखेरपर्यंत जवळपास २३ हजार लिटरची घट नोंदली गेली आहे.

खासगी डेअऱ्यांच्या संकलनात प्रतिदिन घट नोंदली गेली असली तरी त्या घटीतील वाटा शासकीय व सहकारी डेअऱ्यांच्या संकलनातून काही अंशी भरण्याचे काम केले आहे. चारा आणि पाण्याचा प्रश्नामुळे दुधाच्या संकलनाने आता घटीकडे वाटचाल सुरू केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात जानेवारी महिन्याअखेर ५ लाख ३२ हजार लिटर प्रतिदिन दूध संकलन केले जात होते. फेब्रुवारी अखेर हे दूध संकलन ५ लाख १२ हजार लिटरवर आल्याची नोंद झाली आहे. 

फेब्रुवारीअखेर जिल्हानिहाय प्रतिदिन सरासरी दूध संकलन 
औरंगाबाद १ लाख ६२ हजार लिटर
जालना ४५ हजार लिटर
बीड १ लाख ७० हजार लिटर 
उस्मानाबाद ५ लाख १२ हजार लिटर
लातूर ९५ हजार लिटर 
नांदेड ६२ हजार 
परभणी-हिंगोली  ६२ हजार लिटर

 


इतर बातम्या
निर्यात न करणाऱ्या कारखान्यांच्या साखर...कोल्हापूर : देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
सातारा जिल्ह्यातील ६३ हजारांवर...सातारा  : महात्मा जोतिराव फुले शेतकरी...
मुख्यमंत्र्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवादअमरावती : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या...कोल्हापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी...
वाशीम जिल्ह्यात ४३७ शेतकऱ्यांचा यादीत...वाशीम  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याचा विकास गतीने...
शेतकरी कर्जमुक्तीसाठी सोलापुरात आधार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
राज्य सरकारकडून २४ हजार कोटींच्या...मुंबई  : राज्य विधिमंडळाच्या...
खासदार डॅा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य...सोलापूर  ः सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ....
कर्जमुक्तीत रत्नागिरी जिल्ह्यातील २३४...रत्नागिरी ः महात्मा जोतीराव फुले शेतकरी...
नगर जिल्ह्यात मिळणार डिजिटल स्वाक्षरीचा...नगर  ः ऑनलाइन सात-बारा संगणकीकरणाच्या...
पुणे जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेच्या...पुणे  ः जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले...
नाशिक  : चांदोरी,सोंनाबे येथे...नाशिक  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांचा...नगर  ः  सायेब, मागच्या काळात...
सांगलीच्या ५९६ शेतकऱ्यांचा...सांगली ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
भंडारा जिल्ह्यात ३५ हजार शेतकरी...भंडारा ः राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त...
टेंभू उपसा सिंचन योजनेचे १९ पंप सुरूसांगली  ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे १९५०...
नगर, नाशिकच्या शेतकऱ्यांची ८८ कोटींवर...नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांतील पंधरा...
कृषी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा...पुणे  ः कृषी विभागाच्या वतीने चौथ्या वार्षिक...
कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; ६८...मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री...