नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दुधात साडेतीन लाख लिटरची घट

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दुधात साडेतीन लाख लिटरची घट
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दुधात साडेतीन लाख लिटरची घट

परभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत येथील दुग्ध शाळेतील दूध संकलनात यंदाच्या मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात ३ लाख ५४ हजार १४ लिटरने घट झाली आहे. यंदाच्या मे महिन्यात १६ लाख ९३ हजार ५८६ लिटर, तर जूनमध्ये १३ लाख ३९ हजार ५७२ लिटर दूध संकलन झाले. पावसाअभावी चाऱ्याची उपलब्धता कमी झाली आहे. दूग्धशाळेकडून दुधाची देयके मिळण्यास विलंब लागत असल्याने दूध संकलनात घट झाली.

सध्या परभणी येथील दुग्ध शाळेत परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील दूध संकलन केले जात आहे. मे महिन्यात परभणी तालुक्यातील ५ लाख ७० हजार ४७४ लिटर दूध संकलन झाले होते. पाथरी तालुक्यातून ६ लाख ६३ हजार ७१२ लिटर, गंगाखे तालुक्यातील २ लाख ५६ हजार ५१५ लिटर, हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार ४३५ लिटर, नांदेड जिल्ह्यातील ७० हजार ४५० लिटर असे मे महिन्यात प्रतिदिन सरासरी ५४ हजार ६३२ या प्रमाणे एकूण १६ लाख ९३ हजार ५८६ लिटर दूध संकलन झाले.

जूनमध्ये परभणी तालुक्यातील ४ लाख ६० हजार १३८ लिटर, पाथरीतील ५ लाख ३१ हजार ३८९ लिटर, गंगाखेडमधील १ लाख ९७ हजार ४६१ लिटर, हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ४८७ लिटर, नांदेड जिल्ह्यातील ४३ हजार ३०३ लिटर असे प्रतिदिन सरासरी ४४ हजार ६५२ लिटर याप्रमाणे एकूण १३ लाख ३९ हजार ५७२ लिटर दूध संकलन झाले. 

अनेक शेतकऱ्यांकडील साठवून ठेवलेला चारा संपला आहे. दुधाची देयके दोन -दोन महिने मिळत नाहीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दुधाळ जनावरांची विक्री करून दुग्ध व्यवसाय बंद केले. 

तुलनात्मक दूध संकलन स्थिती (लिटर)

शितकरण केंद्र मे जून
परभणी ५७०४७४ ४६०१३८
पाथरी ६६३७१२ ५३३१३९
गंगाखेड २५६५१५ १९७४६१
हिंगोली १३२४३५ १००४८७
नांदेड  ७०४५०   ४३३०३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com