Agriculture news in Marathi Register demand for Mhasal water | Page 2 ||| Agrowon

म्हैसाळच्या आवर्तनासाठी पाणी मागणीची नोंदणी करा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

आतापर्यंत एक हजार एकरासाठी पाण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र पाण्याची मागणी नोंदणी केल्याशिवाय आवर्तन सुरू करता येत नसल्याचा पवित्रा पाटबंधारे विभागाने घेतला आहे.

सांगली ः मिरज पूर्व भागासह कवठेमहांकाळ, जत तालुक्‍याच्या दुष्काळी भागासाठी तातडीने म्हैसाळ योजना सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. आतापर्यंत एक हजार एकरासाठी पाण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र पाण्याची मागणी नोंदणी केल्याशिवाय आवर्तन सुरू करता येत नसल्याचा पवित्रा पाटबंधारे विभागाने घेतला आहे.

त्यामुळे म्हैसाळचे आवर्तन सुरू होण्यात विलंब होण्याची शक्यता आहे. परिणामी, दुष्काळी पट्ट्यात पाणीटंचाई भासण्यास सुरू होईल. वेळेत पाणी सुरू झाले तरच पाणीटंचाई भासणार नाही आणि उन्हाळी पिकांसह अन्य पिकांना वेळेत पाणी देता येईल.

मिरज तालुक्‍याच्या पूर्व भागासह कवठेमहांकाळ, जत तालुक्‍यांमधील दुष्काळी जनतेसाठी तातडीने म्हैसाळ योजना सुरू करावी, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्यासह मिरज पंचायत समितीचे सभापती अनिल आमटवणे यांनी जलसंपदा विभागाला केली आहे. परंतु या मागणीकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केले असल्याचे चित्र आहे. वास्तविक पाहता योजनेचे आवर्तन सुरू करायचे असल्यास शेतकऱ्यांनी पाणी मागणीची नोंदणी करावी, असा नियम लागू गेला आहे.

मागणी आल्यानंतरच योजनेचे आवर्तन सुरू होणार. तोपर्यंत पाणीटंचाईची भीषणता वाढली जाणार. पाणी वेळेत मिळाले नाही तर त्याचा फटका पिकांना बसला जाणार आहे. आवर्तन सुरू करण्यासाठी ५० हजार एकरांसाठी मागणीची गरज आहे. तरच आवर्तन सुरू होईल.दरम्यान, पाटबंधारे विभागाने पाणी मागणीची नोंदणी करावी, असे आवाहनदेखील करण्यात आले होते. त्यानुसार एक हजार एकर मागणीच आली आहे. दहा ग्रामपंचायतींनी पाण्याची मागणी केली आहे.

म्हैसाळ योजना सुरू करण्यासाठी अद्याप शेतकऱ्यांची हवी तशी मागणी आलेली नाही. किमान ग्रामपंचायतीकडून तरी मागणी अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनीही तातडीने अपेक्षित नोंदणी करावी लागेल. दहा दिवसांत पाणी सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय होईल.
- सूर्यकांत नलवडे, कार्यकारी अभियंता, म्हैसाळ सिंचन योजना

नोंदणीनंतर येणार वेग

  • शेतकरी, ग्रामपंचायतींना मागणी नोंदविण्याचे आवाहन
  • यंत्रे, पंपहाउस दुरुस्तीचे कामे लवकर पूर्ण करणार
  • मागणी आल्यानंतर आठ ते दहा दिवसांत आवर्तन सुरू केले जाणार

इतर ताज्या घडामोडी
पाच दिवसांत तब्बल ५० टन काजू बी खरेदी सिंधुदुर्गनगरी ः फळपीक बागायतदार संघाने गेल्या...
वाढत्या तापमानातील द्राक्ष बागेतील...प्रत्येक भागात सध्याच्या परिस्थितीचा विचार करता...
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...
फळाचे ‘प्रमोशन’, मूल्यवर्धन होण्याची...चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू...
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारनारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या...
सामूहिक प्रयत्नातून काजू उत्पादकांची...जागतिक बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या...
क्षेत्र वाढ, प्रक्रियेसाठी सरकारी...देशात पेरू लागवडीचे सुमारे तीन लाख हेक्टर आणि...