agriculture news in Marathi register sandal on sat-bara Maharashtra | Page 2 ||| Agrowon

चंदनाची सात-बारा उताऱ्यावर नोंद घ्या: दादा भुसे

टीम अॅग्रोवन
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

नगर ः शेतकऱ्यांना शेतात चंदन लागवड करण्यास शासनाची परवानगी आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी चंदनाची लागवड केली आहे, त्याची नोंद सात-बारा उताऱ्यावर घ्यावी, रखडलेल्या अनुदानाचा प्रश्‍न मार्गी लावावा, असे आदेश कृषिमंत्री दादा भुसे यांनी सचिवांना दिले. 

नगर ः शेतकऱ्यांना शेतात चंदन लागवड करण्यास शासनाची परवानगी आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी चंदनाची लागवड केली आहे, त्याची नोंद सात-बारा उताऱ्यावर घ्यावी, रखडलेल्या अनुदानाचा प्रश्‍न मार्गी लावावा, असे आदेश कृषिमंत्री दादा भुसे यांनी सचिवांना दिले. 

आमदार नीलेश लंके आणि चंदन उत्पादक शेतकरी राजेंद्र गाडेकर यांनी मंत्री भुसे यांच्याकडे नोंदीसाठी पाठपुरावा केला. शेतकऱ्यांना चंदन लागवड करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी शासनाची परवानगी मिळाली. त्यानुसार राज्यासह जिल्ह्यातील सुमारे ४००हून अधिक शेतकऱ्यांनी चंदनाची शेतात लागवड केली. मात्र लागवड केलेल्या चंदनाची सातबारावर नोंद घेण्याबाबत टाळाटाळ केली जात असल्याचे सातत्याने दिसून येत होते. याशिवाय चंदन लागवडीला अनुदान देय असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. 

गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी अनुदानासाठी पाठपुरावा करत असतानाही ते मिळत नसल्याची तक्रारी होत्या. त्यामुळे याबाबत आमदार लंके, शेतकरी गाडेकर यांनी मंत्री भुसे यांची चंदन लागवड प्रश्नावर भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर मंत्री भुसे यांनी चंदन लागवडीची सात-बारा उताऱ्यावर नोंद घ्यावी, तातडीने रखडलेल्या अनुदानाचा प्रश्‍न मार्गी लावावा, अशा सूचना सचिवांना दिल्याचे श्री. गाडेकर यांनी सांगितले.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात उष्ण, दमट हवामानाचा अंदाज;...पुणे : तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने उन्हाचा...
राज्यात आत्तापर्यंत तेरा हजार टन...नगर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
प्रयोगशीलतेतून मिळवले आर्थिक स्थैर्यनाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील शिवाजी शंकर देशमुख...
...शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' !सांगली : कोरोनाने सर्वांची झोप उडाली आहे. संपूर्ण...
केसरची चव यंदा दुर्मिळ; संकटांमुळे आंबा...औरंगाबाद: यंदा बहुतांश आंबा बागांना मोजकाच मोहर...
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या...मुंबई : राज्यात कोरोनाबाधित १४५ नवीन रुग्णांची आज...
दूध भुकटी योजनेसाठी १८७ कोटी मंजूर मुंबई: कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या विपरीत...
फळे, भाजीपाला थेट विक्रीसाठी ...नगर : फळे, भाजीपाला विक्रीसाठी नगर जिल्ह्यामधील...
पहिल्याच दिवशी २६० किलो मोसंबी वाजवी...औरंगाबाद : आधी बागवानाने मागितली तेव्हा दिली नाही...
कृषी उत्पादनांसह निर्धारीत अत्यावश्‍यक...नवी दिल्ली: देशात कोरोना विषाणूचा प्रसार...
समाजविघातक वृत्तींवर कडक कायदेशीर...मुंबई: कृपा करून शिस्त पाळा, सहकार्य करा असे मी...
शेती अवजारे, स्पेअरपार्टस् दुकानांना...नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी (ता...
मराठवाड्यात आजही वादळी पावसाची शक्यता पुणे: उन्हाचा ताप वाढल्याने सोलापूर, मालेगाव,...
करडई संशोधन प्रकल्‍पास मान्यता परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
भारत - इस्राईल मैत्रीतून उजळणार...भारत आणि इस्राईल देशातील पंतप्रधानांच्या भेटीतून...
राज्य अंधारात जाण्याचा धोकाः डॉ. नितीन...मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता.५...
चारशे वर्षात पहिल्यांदाच वारकऱ्यांविना...सोलापूर ः सुमारे ४०० वर्षाची परंपरा असलेल्या...
शेतकरी कंपन्यांचाही ‘ई-नाम’मध्ये समावेश नवी दिल्ली: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर...
राज्यात उन्हाचा चटका वाढला पुणे: एप्रिल महिना सुरू होताच राज्यात उन्हाच्या...