agriculture news in Marathi registrar of rahuri agriculture university suspended Maharashtra | Agrowon

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव मोहन वाघ निलंबित 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 मे 2021

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव मोहन वाघ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी बुधवारी सायंकाळी ही कारवाई केल्याचे पत्र काढले. निलंबनाचे कारण मात्र गुलदस्तात आहे.

नगर ः राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव मोहन वाघ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी बुधवारी सायंकाळी ही कारवाई केल्याचे पत्र काढले. निलंबनाचे कारण मात्र गुलदस्तात आहे. कुलसचिव पदाचा कारभार महानंद माने यांच्याकडे देण्यात आला आहे. 

दरम्यान, अधिकार नसताना कारवाई केली आहे. नियुक्ती प्राधिकारी व शिस्तभंगविषयक प्राधिकारी आपण असून, निलंबन आदेश आपल्या स्तरावरून द्यावेत, अशी विनंती करणारे पत्र वाघ यांनी कृषी सचिव एकनाथ डवले यांना दिले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील असमन्वय या निमित्ताने पुन्हा एकदा पुढे आला आहे. 

गतवर्षीच्या कोरोना काळात शेतकऱ्यांसाठी भरीव काम केल्याने कृषी विभागाकडून गौरविलेले अकोले येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव पदावर गेल्या वर्षी जूनमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा अजून दोन महिन्यांचा कालावधी असतानाच कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले व त्यांचा पदभार येथील महानंद माने यांच्याकडे देण्यात आला.

वाघ यांच्या निलंबनाचे मुख्य कारण मात्र गुलदस्तातच आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रात असलेल्या सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील एक प्रकरण, माहिती अधिकार व अन्य काही कारणाने वाघ यांना मागील काळात कारणे दाखवा नोटिसा दिल्या होत्या. शिस्तभंगानुसार कारवाई केली जात असल्याचे सांगितले जात असले, तरी निलंबनासाठी लागणारे गंभीर कारण मात्र स्पष्ट केले नसल्याचे दिसत आहे. याबाबत कोणी बोलायलाही तयार नाही. 

डॉ. पाटील दोन महिन्यांपूर्वीच कुलगुरू झाले आहे. संशोधन व अन्य बाबीत सुधारणा होण्याऐवजी वाघ यांचे अचानक निलंबन झाल्याने विद्यापीठात खळबळ उडाली आहे. ‘‘वाघ यांच्यावर कुठलेही गंभीर कारण नसताना केवळ जाणीवपूर्वक टार्गेट करून कारवाई केली आहे. त्यामुळे निलंबन मागे घ्यावे अशी मागणी करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ भेटून विद्यापीठातील वस्तुस्थिती सांगणार आहे,’’ असे शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी सांगितले. 

प्रतिक्रिया 
मी वर्षभरात विद्यापीठासाठी भरीव काम केले आहे. माझ्या काळात अनेक प्रलंबित प्रकरणे निकाली काढली, प्रलंबित अहवाल शासनाला सादर केले. विद्यापीठाच्या जमिनीचे रेकॉर्ड अद्ययावत केले. यांसह विविध बाबींवर काम केले असताना व कोणतीही गंभीर चूक नसताना केवळ टार्गेट करून चुकीची कारवाई केली आहे. चुकीच्या कारवाईबाबत मी शासनाला कळवले आहे. 
- मोहन वाघ, कुलसचिव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी 


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात मुसळधारेची शक्यता पुणे : उत्तरेकडे मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
दूधप्रश्‍नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
‘द्राक्ष क्लस्टर’मध्ये नाशिकचा समावेश नाशिक : केंद्र सरकारने देशभरात विविध ५३ पिकांचे...
सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेला गती...पुणे ः पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना...
कोकणसह कोल्हापुरात पावसाने दाणादाण पुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड,...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे...सोलापूर ः राज्यातील फळबागांसाठी असलेल्या...
सिंधुदुर्ग पूरस्थितीच्या उंबरठ्यावरसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल ५०० ते २३००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते १६०० रुपये अकोला ः...
खानदेशातील आवार प्रगतीवर स्वारआवार (ता.जि. जळगाव) हे कापूस, दादर ज्वारीसाठी...
राज्यात २१८ तालुक्यांमध्ये दमदार पाऊस;...पुणे ः जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील २१८...
राज्यात खरीप पेरणी तीन टक्केनगर ः राज्यात यंदा आतापर्यंत खरिपाची सरासरीच्या...
दूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
विदर्भात पावसाचा जोर वाढणारपुणे : राज्यातील बहुतांशी भागात उन्हासह अंशतः...
अनेक वर्षांपासून जपली आले उत्पादकता अन्...आले पिकातील दरांत दरवर्षी चढउतार होते. मात्र...
भाजीपाला बीजोत्पादनातील ‘मास्टर’जिद्द, हिंमत, अभ्यास, ज्ञान घेण्याची वृत्ती व...
कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता पुणे : कोकण ते अरबी समुद्राच्या दरम्यान कमी...
पूर्वविदर्भात जोरदार पाऊस पुणे : राज्यातील काही भागांत पावसाचा दणका सुरूच...
जालन्यातील ऊस संशोधन केंद्र उभारणीला...पुणे ः ऊस शेतीच्या विकासासाठी विदर्भ,...
दूध दरांसाठी ग्रामसभांच्या ठरावाची...नगर : राज्यात दुधाला दर दिला जात नसल्याने दूध...
आता शेतकरीच करणार पीकपाहणी पुणे ः तलाठ्याकडून गावशिवारात प्रत्यक्ष पाहणी...