agriculture news in marathi, Registration of 10 thousand farmers for Maharasham in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात ‘महारेशीम’साठी १० हजारांवर शेतकऱ्यांची नोंदणी

टीम अॅग्रोवन
रविवार, 14 जुलै 2019

औरंगाबाद :  शेतकऱ्यांना शाश्‍वत उत्पन्नाचा मार्ग दाखविणाऱ्या रेशीम उद्योगासाठी महारेशीम अभियानाच्या माध्यमातून मराठवाड्यातील १० हजार ८१४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. प्रशिक्षण व रोपनिर्मितीविषयीची तयारी पूर्ण झाली आहे. तरीही लांबलेल्या पावसाने तुती लागवडीत व्यत्यय आणण्याचे काम केल्याने लागवड रखडली आहे. 

औरंगाबाद :  शेतकऱ्यांना शाश्‍वत उत्पन्नाचा मार्ग दाखविणाऱ्या रेशीम उद्योगासाठी महारेशीम अभियानाच्या माध्यमातून मराठवाड्यातील १० हजार ८१४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. प्रशिक्षण व रोपनिर्मितीविषयीची तयारी पूर्ण झाली आहे. तरीही लांबलेल्या पावसाने तुती लागवडीत व्यत्यय आणण्याचे काम केल्याने लागवड रखडली आहे. 

मराठवाड्यात २०१९-२० साठी ५४०० एकरांवर तुती लागवडीचा लक्षांक देण्यात आला होता. त्यामध्ये औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड जिल्ह्यांसाठी प्रत्येकी ९०० एकर, परभणी, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांसाठी प्रत्येकी ५०० एकर, तर हिंगोली जिल्ह्यासाठी ३०० एकरच्या उद्दिष्ट होते. त्याच्या पूर्तीसाठी महारेशीम अभियान राबविण्यात आले. त्यातून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतून १० हजार ८१४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यामध्ये मनरेगातंर्गत ९७९७ शेतकऱ्यांची नोंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मनरेगांतर्गत तुती लागवडीसाठी रेशीम विभागातर्फे रोपनिर्मितीसाठी शेतकऱ्यांच्या नर्सरीच्या माध्यमातून मोहीम राबविली. त्यातून २ कोटी ६७ लाख रोपांची निर्मिती करण्यात आली. उर्वरित लागणाऱ्या रोपाची मागणी रेशीम विभागाने सामाजिक वनीकरणकडे नोंदविली आहे.

सील्क समग्र योजनेसह नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातूनही तुती लागवड व रेशीम उद्योगासाठी शेतकरी जोडण्याचे काम करण्यात आले. या शेतकऱ्यांना लागवड व तांत्रिक प्रशिक्षणही देण्यात आले. नोंदणी केलेल्या एकूण शेतकऱ्यांच्या तुलनेत किमान ६० ते ७० टक्‍के तुतीची लागवड होणे अपेक्षित असल्याचे रेशीम विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

तुती लागवडीला ब्रेक 

लागवडी योग्य पाऊस मराठवाड्यातील तुरळक भागातच झाला आहे. तो वगळता तुती लागवडीला ब्रेकच लागला आहे. त्याचा थेट परिणाम रेशीम कोष उत्पादकांच्या बॅचवरती होण्याची चिन्ह आहेत. रेशीम कोष उत्पादकांचे नियोजन पाहता जुलैमध्ये लागवड झाल्यास रेशीम कोष उत्पादकांना किमान तीन बॅच घेणे शक्‍य होते. ऑगस्टपर्यंत लागवड लांबल्यास अधिकाधिक एक बॅच घेणे शक्‍य होत असल्याचे रेशीम विषयाच्या जाणकारांचे मत आहे.


इतर ताज्या घडामोडी
अंजीर-सिताफळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ...पुणे : महात्मा फुले कृषी विद्यापिठाच्या ...
तोलाई मजुरीसाठी सांगली बाजार समितीच्या...सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तोलाई...
परभणी जिल्ह्यात सिंचनाची ५० कोटींवर...परभणी : जिल्ह्यातील लघू, मध्यम, मोठ्या...
खानदेशात रब्बी ज्वारी, मक्यावर लष्करी...जळगाव : खानदेशात खरिपात शेतकऱ्यांना फटका बसलेला...
परभणीत गाजर ८०० ते १५०० रुपये...परभणी  : येथील पाथरी रस्त्यावरील फळे...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत साडेआठ...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड या तीन...
अमरावती विभागात सहा लाख ८३ हजार शेतकरी...अमरावती ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
एम्प्रेस गार्डनच्या पुष्पप्रदर्शनाला...पुणे ः एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनच्या वतीने आयोजित...
अकोल्यात भारिप, वाशीममध्ये...अकोला ः जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष...
पुणे जिल्ह्यात उद्या पल्स पोलिओ लसीकरण...पुणे : पोलिओच्या आजाराचे उच्चाटन करण्याच्या...
पत्नीच्या नावे कामकाजासाठी येणाऱ्या...बुलडाणा ः स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना...
पाणी, शेती विकासासह समाजकारणाला...नगर : निवडणुकीत पराभव मी मानत नाही. लोकांचे...
पुणे जिल्ह्यात ज्वारी पिकावर चिकट्याचा...पुणे ः पुणे जिल्ह्याच्या पश्चिम जिरायत भागात...
प्रशासकीय कामकाज सेवा हमी कायद्यानुसार...अकोला ः शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत...
वीज रोहित्र ४८ तासांत बदलून द्या;...अकोला ः वीज रोहित्रांबाबत शेतकऱ्यांच्या असंख्य...
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना न्याय न...मुंबई ः केंद्र सरकारचे कृषीविषयक धोरण सातत्याने...
पुणे, मुंबई बाजार समितीच्या निवडणुका...पुणे ः उच्च न्यायालयाच्या आदेशाने सुरू असलेल्या...
फडणवीस सरकारच्या टेंडर मॅनेजमेंट...मुंबई ः काँग्रेस पक्षाने २६ ऑगस्ट २०१९ व २९ ऑगस्ट...
शेतीमाल निर्यातबंदी उठवण्यासाठी लढा...औरंगाबाद : शेतकऱ्यांना दिलेली आश्‍वासने पूर्ण...
साखर उद्योग सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील...पुणे ः साखर उद्योगाचे एक चक्र असून, या उद्योगाला...