हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
ताज्या घडामोडी
औरंगाबाद, जालना, लातूरमध्ये हरभरा विक्रीसाठी १२ हजार शेतकऱ्यांकडून नोंदणी
लातूर : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व लातूर या तीन जिल्ह्यात आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी १२ हजार २९९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली.
लातूर : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व लातूर या तीन जिल्ह्यात आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी १२ हजार २९९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली.
मका, सोयाबीन, तूरीनंतर हरभरा खरेदीसाठी केंद्र सुरू करून त्यावरून ऑनलाइन नोंदणी करण्याची प्रक्रिया १५ फेब्रुवारीपासून सुरु करण्यात आली. तत्पूर्वी कृषी विभागाच्या दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार मराठवाड्यातील विविध केंद्रांवरून ५१०० रुपये प्रतिक्विंटल आधारभूत दराने हरभऱ्याची खरेदी करण्यासाठी जिल्हानिहाय उत्पादकता जाहीर करण्यात आली.
औरंगाबाद जिल्ह्यात हेक्टरी ७ क्विंटल १० किलो, जालना हेक्टरी ११ क्विंटल , बीड हेक्टरी १० क्विंटल, लातूर हेक्टरी १३ क्विंटल ५० किलो, उस्मानाबाद हेक्टरी ७ क्विंटल ५० किलो, नांदेड हेक्टरी १० क्विंटल १५ किलो, परभणी हेक्टरी ८ क्विंटल तर हिंगोली हेक्टरी १० क्विंटल ३२ किलो प्रमाणे हरभऱ्याची खरेदी केली जाणार आहे. जालना जिल्ह्यात हरभरा खरेदीसाठी ९ केंद्रे सुरू करण्यात आली. येथून १९२३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली.
औरंगाबाद जिल्ह्यात ७ केंद्रात १६४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. लातूर जिल्ह्यात सर्वाधिक १६ केंद्र हरभऱ्याच्या खरेदीसाठी सुरू करण्यात आली. या केंद्रांत सर्वात जास्त १० हजार २१२ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यापैकी ३५१ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठी संदेश पाठविण्यात आले. त्यापैकी एका शेतकऱ्यांकडील १७ क्विंटल ८४ किलो हरभऱ्याची खरेदी करण्यात आली, अशी माहिती लातूरचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी यादव सुमठाणे यांनी दिली.
तूर विक्रीकडे पाठ
आधारभूत दराने तुरीची खरेदी करण्यासाठी सुरू केलेल्या शासकीय खरेदी केंद्रांना प्रतिसादच मिळत नसल्याची स्थिती आहे. तुरीच्या आधारभूत दराने खरेदीसाठी औरंगाबाद जिल्ह्यात सात केंद्रे सुरू करण्यात आली. या केंद्रावरून ३३१ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यापैकी १०१ शेतकऱ्यांना संदेश पाठविण्यात आले. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. जालना जिल्ह्यात नऊ केंद्रांत २२४५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी कोणीही केंद्राकडे फिरकले नाही. तुरीचे खासगी बाजारातील अधिक दर त्याचे कारण मानले जात आहे.