agriculture news in marathi Registration from 12,000 farmers for sale of gram in Aurangabad, Jalna, Latur | Agrowon

औरंगाबाद, जालना, लातूरमध्ये हरभरा विक्रीसाठी १२ हजार शेतकऱ्यांकडून नोंदणी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 मार्च 2021

लातूर : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व लातूर या तीन जिल्ह्यात आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी १२ हजार २९९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली.

लातूर : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व लातूर या तीन जिल्ह्यात आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी १२ हजार २९९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली.

मका, सोयाबीन, तूरीनंतर हरभरा खरेदीसाठी केंद्र सुरू करून त्यावरून ऑनलाइन नोंदणी करण्याची प्रक्रिया १५ फेब्रुवारीपासून सुरु करण्यात आली. तत्पूर्वी कृषी विभागाच्या दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार मराठवाड्यातील विविध केंद्रांवरून  ५१०० रुपये प्रतिक्विंटल आधारभूत दराने हरभऱ्याची खरेदी करण्यासाठी जिल्हानिहाय उत्पादकता जाहीर करण्यात आली.

औरंगाबाद जिल्ह्यात हेक्टरी ७ क्विंटल १० किलो, जालना हेक्‍टरी ११ क्विंटल , बीड हेक्‍टरी १० क्विंटल, लातूर हेक्‍टरी १३ क्विंटल ५० किलो, उस्मानाबाद हेक्टरी ७ क्विंटल ५० किलो, नांदेड हेक्टरी १० क्विंटल १५ किलो, परभणी हेक्टरी ८ क्विंटल तर हिंगोली हेक्टरी १० क्विंटल ३२ किलो प्रमाणे हरभऱ्याची खरेदी केली जाणार आहे. जालना जिल्ह्यात हरभरा खरेदीसाठी ९ केंद्रे सुरू करण्यात आली.  येथून १९२३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली.

औरंगाबाद जिल्ह्यात ७ केंद्रात १६४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. लातूर जिल्ह्यात सर्वाधिक १६ केंद्र हरभऱ्याच्या खरेदीसाठी सुरू करण्यात आली.  या केंद्रांत सर्वात जास्त १० हजार २१२ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यापैकी ३५१ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठी संदेश पाठविण्यात आले. त्यापैकी एका शेतकऱ्यांकडील १७ क्विंटल ८४ किलो हरभऱ्याची खरेदी करण्यात आली, अशी माहिती लातूरचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी यादव सुमठाणे यांनी दिली.

तूर विक्रीकडे पाठ 

आधारभूत दराने तुरीची खरेदी करण्यासाठी सुरू केलेल्या शासकीय खरेदी केंद्रांना प्रतिसादच मिळत नसल्याची स्थिती आहे. तुरीच्या आधारभूत दराने खरेदीसाठी औरंगाबाद जिल्ह्यात सात केंद्रे सुरू करण्यात आली. या केंद्रावरून ३३१ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यापैकी १०१ शेतकऱ्यांना संदेश पाठविण्यात आले. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. जालना जिल्ह्यात नऊ केंद्रांत २२४५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी कोणीही केंद्राकडे फिरकले नाही. तुरीचे खासगी बाजारातील अधिक दर त्याचे कारण मानले जात आहे.


इतर बाजारभाव बातम्या
केळीला विक्रमी १६०० रुपये दरजळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला...
 खानदेशात कांद्याची आवक वाढतच दर दबावातजळगाव :  खानदेशात गेल्या आठवड्यात लाल...
काबुली हरभऱ्याचे दर खानदेशात टिकूनजळगाव :  खानदेशात काबुली हरभऱ्याचे दर यंदा...
लातूर, अकोल्यात तुरीने ओलांडला सात...लातूर/अकोला ः राज्यात काही दिवसांपासून तूर, हरभरा...
खानदेशातील बाजारांमध्ये मक्याची आवक घटलीजळगाव : खानदेशात बाजारात मक्याची आवक मध्यंतरी...
औरंगाबादेत आंबा खातोय भाव, ज्वारीचे दर...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नगरमध्ये कारले, हिरव्या मिरचीच्या दरात...नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार...
सोलापुरात हिरवी मिरची, गवार, भेंडी...सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नाशिकमध्ये लेट खरीप कांद्याची आवक वाढलीनाशिक : जिल्ह्यात मार्चअखेर, बँक बंदमुळे रोकड...
सोयाबीनला उच्चांकी सहा हजारांचा भावलातूर/अकोला ः गेल्या काही दिवसांपासून राज्यात...
पुण्यात लिंबू, संत्र्यांची मागणी, दर...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात केळी दरांवर दबाव वाढण्यास...जळगाव : देशातील विविध भागांत टाळेबंदी,...
सोलापुरात बेदाण्याला कमाल २५१ रुपये दरसोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात तुरीत हलकी घटनागपूर ः विदर्भात सर्वदूर देशांतर्गत मागणी...
खानदेशात बाजारात मका दर स्थिरजळगाव ः खानदेशात बाजारात मक्याची आवक वाढली आहे....
नाशिकमध्ये आंबा प्रतिक्विंटल २५ हजार...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
राज्यात खरबूज ५०० ते २००० रुपयेअकोल्यात क्विंटलला १००० ते १८०० रुपये अकोलाः...
खानदेशात काबुली हरभऱ्याच्या दरात सुधारणाजळगाव  ः  खानदेशात या आठवड्यात बाजार...
लातूरला सोयाबीनचा भाव साडे पाच हजारावरलातूर ः लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...