नगर जिल्ह्यात तूर विक्रीसाठी दहा केंद्रांवर १६५० शेतकऱ्यांची नोंदणी

नगर ः हमी दराने तुरीची विक्री करण्यासाठी जिल्ह्यात आतापर्यंत अकरा केंद्रे मंजूर आहेत. आठ ते दहा दिवसांत प्रत्यक्ष तूर खरेदीला सुरवात होणार असल्याचे सांगितले जात आहे.
नगर जिल्ह्यात तूर विक्रीसाठी दहा केंद्रांवर १६५० शेतकऱ्यांची नोंदणी
नगर जिल्ह्यात तूर विक्रीसाठी दहा केंद्रांवर १६५० शेतकऱ्यांची नोंदणी

नगर ः हमी दराने तुरीची विक्री करण्यासाठी जिल्ह्यात आतापर्यंत अकरा केंद्रे मंजूर आहेत. आठ ते दहा दिवसांत प्रत्यक्ष तूर खरेदीला सुरवात होणार असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत दहा केंद्रांवर १६५० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. अजून दोन ठिकाणी केंद्रे प्रस्तावित असल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमधून सांगण्यात आले. 

जिल्ह्यात यंदा ५८ हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती. मुबलक पाऊस  झाल्याने यंदा काही भागातील अपवाद वगळता तुरीचे चांगले उत्पादन झाले आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार दहा लाख क्विंटलपेक्षा अधिक तुरीचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

सध्या बाजारात तुरीची दर दिवसाला ४०० ते ५०० क्विंटलची आवक होत आहे. मात्र दर्जा नसल्याचे कारण पुढे करत नेहमीप्रमाणे हमीदरापेक्षा पाचशे ते सहाशे रुपये कमी दर मिळत आहे. तरीही बाजार समित्या व प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. याशिवाय वजनातही मनमानी कपात केली जात आहे. 

आठ दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याला व्यापाऱ्याचा मनमानीमुळे विक्रीला आणलेली तूर परत न्यावी लागल्याचा प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडला होता. हमी दर मिळावा, यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत नाफेडकडून तूर खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी अकरा केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. 

दोन केंद्रे प्रस्तावित 

जामखेड येथे १७१, खर्डा व नगर येथे प्रत्येकी चार, कर्जतला ६८१, नगरला १७५, पाथर्डीला ४४१, शेवगावला १३८, मांडवगणला २ व श्रीगोंद्याला १ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. संगमनेरला अजून एकही शेतकऱ्याची नोंदणी नाही. मागणीनुसार अजून दोन ठिकाणी केंद्रे प्रस्तावित असल्याचे  सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com