बीड : हमीभावाने तूर खरेदीला १८००० शेतकऱ्यांची नोंदणी

Registration of 1800 farmers for purchase of tur in Beed district
Registration of 1800 farmers for purchase of tur in Beed district

बीड : जिल्ह्यातील चार खरेदी केंद्रावर प्रत्यक्षात हमी दराने तुरीच्या खरेदीला सुरूवात झाली आहे. तुरीसाठी जवळपास १८ हजारावर तर हरभऱ्यासाठी १९३० शेतकऱ्यांनी हमी दराने खरेदीसाठी नोंदणी केली आहे. येत्या तीन ते चार दिवसांत सर्वच ११ खरेदी केंद्रावर हमी दराने तुरीची खरेदी सुरू होणार असल्याची माहिती डीएमओ कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. 

बीड जिल्ह्यात हमी दराने तुर व हरभरा खरेदीसाठी ११ केंद्र मंजूर करण्यात आली आहे. भारतीय खाद्य निगमअंतर्गत मंजूर या केंद्रांमध्ये बीड, गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, धारूर, शिरूर, पाटोदा, आष्टी, मंगरूळ, शिराळा, फुलसांगवी आदी केंद्रांचा समावेश आहे. तुरीच्या हमीदराने खरेदी करण्यासाठीची ऑनलाइन नोंदणीची मुदत १५ मार्चला संपली असून, हरभऱ्यासाठी ऑनलाइन नोंदणीची मुदत अजून बाकी आहे. 

रविवारी झालेल्या तुरीच्या ऑनलाइन नोंदणीच्या मुदतीत बीड जिल्ह्यातील ११ ही केंद्रांवर  १८ हजार २६१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. मंजुरी मिळालेल्या ११ केंद्रापैकी आष्टी व कडा येथे सोमवारी (ता. १६) प्रत्यक्षात हमीदराने खरेदीला सुरुवात झाली; तर अंबाजोगाई व परळी येथेही हमीदराने तुरीच्या खरेदीचा प्रारंभ करण्यात आला. येत्या तीन ते चार दिवसांत सर्व खरेदी केंद्रे सुरू होणार असल्याचे डीएमओ कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. 

जिल्ह्यातील ११ खरेदी केंद्रापैकी बीड येथील केंद्रावर २०१७, गेवराई ८५२, माजलगाव १२०२, परळी १४५९, अंबाजोगाई ९०८, धारूर ३३४९, शिरूर १२६१, पाटोदा १२९२, आष्टी २६४६, मंगरूळ १९७३, शिराळा ९२१; तर फुलसांगवी केंद्रावर ३८१ शेतकऱ्यांनी हमीदराने तूर खरेदीसाठी नोंदणी केली. हरभऱ्याची हमीदराने खरेदीचे आदेश येणे अजून बाकी असून नोंदणी मात्र सुरू आहे. 

हरभऱ्यासाठीच्या नोंदणीला परळी, अंबाजोगाई, धारूर, शिरूर, मंगरूळ येथील केंद्रांवर प्रतिसाद मिळाला; परंतु बीड, गेवराई, माजलगाव, पाटोदा, आष्टी, शिराळा, फुलसांगवी या केंद्रांवर नोंदणीला अजून प्रतिसाद मिळणे बाकी असल्याची माहिती डीएमओ कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com