परभणी जिल्ह्यात कृषी संजीवनींतर्गत २१ हजारांवर शेतकऱ्यांची नोंदणी

परभणी जिल्ह्यात कृषी संजीवनींतर्गत २१ हजारांवर शेतकऱ्यांची नोंदणी
परभणी जिल्ह्यात कृषी संजीवनींतर्गत २१ हजारांवर शेतकऱ्यांची नोंदणी

परभणी : जिल्ह्यात जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (हवामान बदलानुकूल कृषी प्रकल्प) राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मिळून एकूण २२९ गावांची निवड झाली आहे. आजवर जिल्ह्यातील २१ हजार ४१० शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे.  

या योजनेतून विविध घटकांसाठी मिळून ४८ हजार ४९७ अर्ज केले आहेत. त्यापैकी फळबाग लागवड, ठिबक, तुषार संच, पाइपलाइन, कृषी पंप, बीजोत्पादन आदीसाठी १ हजार ७३ शेतकऱ्यांना २ कोटी रुपयांवर अनुदान वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

या प्रकल्पांतर्गंत तीन टप्प्यात जिल्ह्यातील एकूण २७५ गावांची निवड केली जाणार आहे. दोन टप्प्यांत परभणी तालुक्यातील २३, जिंतूर तालुक्यातील ४६, सेलू तालुक्यातील ३०, मानवतमधील १३, पाथरीतील २१, सोनपेठमधील १४, गंगाखेड तालुक्यातील ३४, पालममधील २४, तर, पूर्णा तालुक्यातील २४ गावांचा समावेश आहे. या गावांत ग्राम कृषी संजीवनी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

या प्रकल्पांतर्गत सेंद्रिय शेती, फळबाग लागवड, वृक्षलागवड, मधुमक्षिकापालन, शेततळे, हवामान अनुकूल शेतीशाळा संरक्षित शेती (शेडनेट, पाॅलिहाऊस), विहीर पुनर्भरण, सामुदायिक शेततळे, तुती रेशीम उद्योग, नवीन विहीर, पाणी उपसा साधने, बंधिस्त शेळीपालन, हवामानुकूल पायाभूत आणि प्रमाणित बीजोत्पादन आदी घटकांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी करून अर्ज सादर करणे आवश्यक आहे. 

आजवर एकूण १४ हजार ९५३ शेतकऱ्यांची पडताळणी करण्यात आली आहे. ग्राम कृषी संजीवनी समित्यांनी ५ हजार ६०५ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. कृषी सहाय्यक स्तरावर ५ हजार ९८६ प्रस्ताव, तर उपविभागीय कृषी अधिकारी स्तरावर २ हजार ९१ प्रस्ताव प्रलंबित आहेत. एकूण २ हजार ५६७ शेतकऱ्यांचे बॅंक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नाही. जिल्ह्यातील एकूण १ हजार ७३ शेतकऱ्यांना ठिबक, तुषार संच, कृषिपंप, फळबाग लागवड, बीजोत्पादन आदी घटकांसाठी २ कोटी रुपयांवर अनुदान वितरित करण्यात आले आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com