Agriculture news in Marathi Registration of 3783 farmers for sale of gram | Page 2 ||| Agrowon

हरभरा विक्रीसाठी ३७८३ शेतकऱ्यांची नोंदणी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 मार्च 2021

केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत (प्रतिक्विंटल ५१०० रुपये) योजनेअंतर्गत यंदाच्या (२०२०-२१) हंगामात परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १५ केंद्रांवर हरभरा विक्रीसाठी शुक्रवार (ता. २६) पर्यंत ३ हजार ७८३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

परभणी/हिंगोली : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत (प्रतिक्विंटल ५१०० रुपये) योजनेअंतर्गत यंदाच्या (२०२०-२१) हंगामात परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १५ केंद्रांवर हरभरा विक्रीसाठी शुक्रवार (ता. २६) पर्यंत ३ हजार ७८३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

गुरुवारी (ता. २५) हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. परंतु आजवर खरेदी झालेली नाही, अशी माहिती जिल्हा विपणन अधिकारी के. जे. शेवाळे यांनी दिली. पणन महासंघातर्फे परभणी जिल्ह्यात परभणी, जिंतूर, बोरी, सेलू, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या सात ठिकाणी केंद्र असून, आजवर सहा केंद्रांवर ६९४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, जवळा बाजार, वसमत, सेनगाव, साखरा हे सहा खरेदी केंद्रांवर २ हजार ५२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. परभणी जिल्ह्यात विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या मानवत येथील केंद्रावर १ हजार ९२५ शेतकऱ्यांनी अर्ज केले. त्यापैकी २५२ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली तर गंगाखेड केंद्रांवर १ हजार ४२५ अर्ज आले. त्यापैकी ७८५ शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली, असे जिल्हा व्यवस्थापक भागवत सोळंके यांनी सांगितले.

नोंदणी ठिकाण, केंद्र चालकांचे संपर्क क्रमांक ः
परभणी ः नवा मोंढा, परभणी (माणिक नीलवर्ण ः ९९६००९३७९६), जिंतूर ः सिद्धेश्‍वर विद्यालय, जिंतूर (नंदकुमार महाजन ः ९४०५४७३९९९), बोरी ः बोरी (गणेश नांदेडकर ः ८८०६०२८०८२), सेलू  ः मार्केट यार्ड सेलू (संतोष शिंदे ९८६०२५१३२७), पाथरी ः मार्केट यार्ड पाथरी (अनंत गोलाईत ः९९६०५७००४२), सोनपेठ ः बाजार समिती व्यापार संकुल (श्रीनिवास राठोड ः ९०९६६९९६९७), पूर्णा ः समर्थ मार्केट पूर्णा (संदीप घाटोळ ः ९३५५९३३३४१३)

हिंगोली  ः जुने जिल्हा रुग्णालया समोर, तोफखाना, हिंगोली (अमोल काकडे ः ८७८८४८७५८०), कळमनुरी ः वारंगा फाटा ता. कळमनुरी (महेंद्र माने ः ९७३६४४९३८३), वसमत ः वसमत (सागर इंगोले ः ८३९०९९५२९४), जवळा बाजार ः जवळा बाजार (कृष्णा हरणे ः ९१७५५८६७५८) सेनगाव ः हिंगोली रोड, सेनगाव (संदीप काकडे ः ९८२३२५२७०७), साखरा ः साखरा (उमाशंकर माळोदे  ः ९६५७२६०७४३).


इतर ताज्या घडामोडी
पाच दिवसांत तब्बल ५० टन काजू बी खरेदी सिंधुदुर्गनगरी ः फळपीक बागायतदार संघाने गेल्या...
वाढत्या तापमानातील द्राक्ष बागेतील...प्रत्येक भागात सध्याच्या परिस्थितीचा विचार करता...
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...
फळाचे ‘प्रमोशन’, मूल्यवर्धन होण्याची...चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू...
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारनारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या...
सामूहिक प्रयत्नातून काजू उत्पादकांची...जागतिक बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या...
क्षेत्र वाढ, प्रक्रियेसाठी सरकारी...देशात पेरू लागवडीचे सुमारे तीन लाख हेक्टर आणि...