नगर ः कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेतून गेल्या वर्षभरापासून नवीन शेततळ्याची का
ताज्या घडामोडी
तूर विक्रीसाठी ३९८० शेतकऱ्यांची नोंदणी
यंदाच्या खरीप हंगामात (२०२०-२१) आधारभूत किंमत योजनेअंतर्गत तूर विक्रीसाठी शुक्रवार (ता. १५) पर्यंत परभणी जिल्ह्यातील १ हजार ८२० आणि हिंगोली जिल्ह्यात २ हजार १६० शेतकऱ्यांनी असे दोन जिल्ह्यातील मिळून ३ हजार ९८० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
परभणी ः यंदाच्या खरीप हंगामात (२०२०-२१) आधारभूत किंमत योजनेअंतर्गत तूर विक्रीसाठी शुक्रवार (ता. १५) पर्यंत परभणी जिल्ह्यातील १ हजार ८२० आणि हिंगोली जिल्ह्यात २ हजार १६० शेतकऱ्यांनी असे दोन जिल्ह्यातील मिळून ३ हजार ९८० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
राज्य सहकारी पणन महासंघाच्या परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, बोरी, सेलू, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या ७ ठिकाणी आणि हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, जवळा बाजार, सेनगाव, साखरा या ६ ठिकाणी केंद्रांवर शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठी ३ हजार ६५३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, असे जिल्हा पणन अधिकारी के. जे. शेवाळे यांनी सांगितले.
विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या परभणी जिल्ह्यातील मानवत येथील केंद्रांवर एकूण १ हजार ६३० शेतकऱ्यांचे अर्ज आले असून त्यापैकी ३२७ शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी झाली आहे. गंगाखेड येथील केंद्रावर २ हजार ८० शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी २०० शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे, असे जिल्हा व्यवस्थापक भागवत सोळंके यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी तूर विक्री नोंदणीसाठी सोबत खरीप हंगाम २०२०-२१ मधील पीक पेरा नोंद असलेला तलाठ्याच्या सही शिक्क्यानिशीचा ऑनलाइन सातबारा, आधारकार्ड छायांकित प्रत, बँक पासबुक प्रत, सोबत आणावी. बँक पासबुकावर शेतकऱ्याचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोड स्पष्ट नमूद असावा. परंतु जनधन बँक खाते किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
- 1 of 1065
- ››