पुणे जिल्ह्यात ई-पीक पाहणीत ४१ हजार खातेदारांची नोंदणी

पुणे : ई-पीक पाहणीत जिल्ह्यात मार्च महिन्यातील १ ते ८ मार्च या कालावधीत राबविलेल्या फेरफार अदालतीच्या विशेष मोहिमेमध्ये ४१ हजार ६५६ खातेदारांची नोंदणी करण्यात आली आहे.
Registration of 41,000 account holders in e-crop survey in Pune district
Registration of 41,000 account holders in e-crop survey in Pune district

पुणे : ई-पीक पाहणीत जिल्ह्यात मार्च महिन्यातील १ ते ८ मार्च या कालावधीत राबविलेल्या फेरफार अदालतीच्या विशेष मोहिमेमध्ये ४१ हजार ६५६ खातेदारांची नोंदणी करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ५ लाख ७० हजार ४४८ खातेदारांची नोंदणी पूर्ण झाली आहे. मार्चअखेर जास्तीत जास्त खातेदारांना सहभागी करून घेण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात झालेल्या फेरफार अदालतीला नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विसंगत सर्व्हे क्रमांकाची संख्या विशेष मोहीम घेण्यापूर्वी १३ हजार ८० इतकी होती. पहिल्या आठवड्यातच १ हजार ८३१ विसंगत सर्व्हेचे कामकाज पूर्ण करण्यात आले.

उर्वरित ११ हजार २४९ गटांचे दुरुस्तीचे कामकाज  मार्चअखेर करण्याचे उद्दिष्ट आहे. डिजिटल स्वाक्षरीतील सातबारा करण्यावर शिल्लक संख्या विशेष मोहीम घेण्यापूर्वी १० हजार ४४६ इतकी होती. पहिल्या आठवड्यात १ हजार ९९६ गटांचे डिजिटल स्वाक्षरीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ९ हजार २५० एवढे गट सातबारा डिजिटल स्वाक्षरी करण्याचे कामकाज मार्चअखेर करण्याचे नियोजन आहे.

 जिल्ह्यात आज अखेर १० लक्ष ७० हजार नोंदी भरण्यात आल्या आहे. त्यामध्ये एकूण ३ हजार २२१  नोंदी निर्गत करण्यात आल्या आहेत. केवळ ७ हजार १५५ नोंदी मुदतीवरील प्रमाणीकरणासाठी शिल्लक आहेत. तांत्रिक कारण, अपिलात स्थगिती असलेल्या नोंदी बाबतची माहिती संकलित करण्याचे कामकाज सुरू आहे. प्रलंबित तक्रार केसेस जलदगतीने निर्गत करणे शक्य होणार आहे. फेरफार विषयक केले जाणारे नावीन्यपूर्ण कामकाज मार्च महिन्यात दर बुधवारी फेरफार अदालत मंडळ मुख्यालयी घेण्यात येईल. ई-पीक पाहणीमध्ये रब्बी हंगामासाठी पिकांची नोंदणी करण्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदतवाढ आहे. 

नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित संजय गांधी, रेशन कार्ड  महसूल विभागाशी संबंधित अर्ज फेरफार अदालतमध्ये स्वीकारण्याच्या कामकाजाबाबत भर देण्यात येणार आहे. त्याप्रमाणे सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांना निर्देश देण्यात आले आहेत. - संजय तेली, उपजिल्हाधिकारी, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com