परभणीत कापूस विक्रीसाठी ४६ हजार ७७६ शेतकऱ्यांची नोंदणी

परभणी : राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघ (फेडरेशन) आणि भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) यांच्या खरेदी केंद्रांवर कापूस विक्रीसाठी जिल्ह्यातील १० बाजार समित्या अंतर्गंतच्या ४६ हजार ७७६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. लवकरच खरेदी सुरु होईल, असे सहकार विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी गुगल लिंकव्दारे ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी सोमवार (ता.२७) पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार नऊ तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील शिल्लक कापसाच्या विक्रीसाठी ही नोंदणी केली आहे.

रुईचा उतारा आणि घट या मुद्यावर जिनिंग उद्योजक कापूस खरेदीसाठी सहमती दर्शवीत नाहीत. त्यामुळे कापूस खरेदीस उशीर होत आहे. खरेदी सुरु करण्यासाठी उद्योजक, व्यापाऱ्यांशी चर्चा सुरु आहे. लवकरच कापूस खरेदी सुरु होईल, असे सहकार विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  बाजार समितीनिहाय नोंदणी 

बाजार समिती शेतकरी संख्या 
परभणी ७२३७ 
जिंतूर २१३२
बोरी ६४३ 
सेलू ५४७२ 
मानवत ७३२५
पाथरी ४३३०
सोनपेठ ३६१३ 
गंगाखेड १४६११
पूर्णा ६७४
ताडकळस ७३९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com