agriculture news in Marathi registration for cotton procurement stopped Maharashtra | Agrowon

कापूस विक्रीसाठी नोंदणी थांबविली

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

शासकीय केंद्रात कापूस विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये जिल्ह्यात सुरू झालेली नोंदणी जिल्हा प्रशासनाने थांबविली आहे. 

जळगाव ः शासकीय केंद्रात कापूस विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये जिल्ह्यात सुरू झालेली नोंदणी जिल्हा प्रशासनाने थांबविली आहे. पारोळा बाजार समितीच्या नोंदणीच्या कार्यपद्धतीसंबंधी तक्रारी आल्यानंतर नोंदणी बंद करण्याचे आदेश प्रशासनाने बजावले आहेत. 

शासकीय कापूस खरेदीबाबतची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. ही तयारी पूर्ण होत असतानाच जिल्ह्यातील काही बाजार समित्यांबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. त्यात नोंदणी करताना संचालकांची मर्जी, आर्थिक व्यवहार होत असल्याचा दावा करण्यात आला. पारोळा बाजार समितीबाबत माजी आमदार सतीश पाटील यांनी नोंदणी कुणाचेही आदेश नसताना लवकर सुरू केली. 

नोंदणीबाबत आक्षेप त्यांनी घेतले. याची दखल प्रशासनाने घेतली व सर्वच बाजार समित्यांमध्ये सुरू असलेली नोंदणी बंद करण्यात आली. खरेदी सुरू केव्हा होईल, याबाबतही जिल्ह्यात संभ्रम तयार झाला आहे. 

खेडा खरेदीत खासगी खरेदीदार कमी दर देत आहेत. काही जिनींग प्रेसिंग कारखाने सुरू आहेत. या कारखान्यांना सध्या  कमी दरात कापूस मिळत आहे. शासकीय खरेदी सुरू झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान कमी होईल, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

नोंदणीसाठी ‘ॲप’ची मागणी
मध्यंतरी जळगाव लोकसभा क्षेत्राचे खासदार उन्मेष पाटील यांच्याकडेही शेतकऱ्यांनी बाजार समित्यांमधील नोंदणीत संचालक हस्तक्षेप करतात. शेतकऱ्यांचे नुकसान होते. संचालकांची मर्जी खरेदीच्या व्यवहारांत असते. यामुळे नोंदणीसाठी ॲप विकसित करावे. शेतकरी घरबसल्या त्यातून नोंदणी करू शकतील, अशी कार्यवाही करावी, अशी मागणी केली होती. यामुळेदेखील कापूस विक्रीसाठी सुरू झालेली बाजार समित्यांमधील नोंदणी बंद झाल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

प्रतिक्रिया
शासकीय कापूस खरेदी लांबणीवर पडायला नको. प्रशासनाने ॲप किंवा इतर कुठल्याही माध्यमातून नोंदणीला गती द्यावी. कापूस खरेदी पुढील आठवड्यात सुरू व्हायला हवी. अन्यथा शेतकऱ्यांचेच अधिक नुकसान होईल. 
- अविनाश भालेराव, कापूस खरेदी केंद्रधारक कारखानदार, जळगाव


इतर अॅग्रो विशेष
मूळ दुखण्यावर इलाज कधी?सरकार कितीही सांगत असले की आम्ही शेतकऱ्यांना...
‘सूक्ष्म उद्योग’ घडवतील मोठा बदल पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन...
केंद्र सरकारचा समितीचा प्रस्ताव...नवी दिल्ली : विज्ञान भवनात झालेली बैठक कोणत्याही...
यंदा हिवाळ्यात गारठा जरा अधिकच राहणारपुणे : चालू वर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी या हिवाळा...
इथेनॉल प्रकल्प तारण घेऊन कारखान्यांना...पुणे : “राज्याच्या शेती व ग्रामीण अर्थकारणाला...
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सक्रिय;...पुणे : बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या...
नव्या कायद्यामुळेच मिळाले पैसे;...धुळे : कृषी व पणन सुधारणा कायदा अस्तित्वात...
शेतकरी संघटनांचा उद्या राज्यव्यापी...नगर : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या...
कापूस खरेदीतील कटती अयोग्य; सीसीआय...जळगाव : कापूस महामंडळ (सीसीआय) शेतकऱ्यांसाठी काम...
राज्यात ‘पणन’ची दहा हजार क्विंटल कापूस...नागपूर : राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी...
मराठवाड्यात कुठे मोहर, तर कुठे...औरंगाबाद : मराठवाड्यातील केसर आंब्याच्या झाडाला...
विविध तंत्रांचा वापर सांगणारी लंबे...बुलडाणा जिल्ह्यातील माळखेड येथील गणेश लंबे यांनी...
संवादातून मिटेल संघर्षकृषी व पणन सुधारणांबाबतच्या तीन नव्या...
हमीभाव ः वादीवाल्यांचा सापळालातूरला पुर्वी वादीवाले लुटारु टोळके असायचे. ते...
केंद्राचा चर्चेचा प्रस्ताव नाकारला;...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या वतीने...
...येथे कांदा रोपे राखणीसाठी...विसापूर, जि. सातारा  : सोन्याचे दाग-दागिने,...
कृषी विभागात आगामी बदल्या समुपदेशनाने...पुणे : कोविड-१९ साथीमुळे कृषी विभागात यंदा...
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या...पुणे :  निवार चक्रीवादळाचा प्रभाव निवळत...
कृषी पदव्युत्तर पदवीच्या प्रवेश...पुणे : राज्यातील चारही कृषी विद्यापीठाअंतर्गत...
सातत्य राखलेले पशुपालन ठरले शेतीलाही...यवतमाळ जिल्ह्यातील लोही (ता. दारव्हा) येथील...