लातूर जिल्ह्यात तूर, हरभऱ्यासाठी ४१ हजारांवर शेतकऱ्यांची नोंदणी

Registration of farmers in Latur district for Tur, grams, at 41,000 farmers
Registration of farmers in Latur district for Tur, grams, at 41,000 farmers

लातूर  : जिल्ह्यात तूर आणि हरभऱ्याच्या खरेदीसाठी १२ केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. ही सर्व केंद्र सुरू करण्यात आली आहेत. तुरीसाठी ऑनलाइन नोंदणीच्या १५ मार्चपर्यंतच्या मुदतीत २९ हजार ८३७, तर हरभऱ्यासाठी १२ हजार १११ शेतकऱ्यांनी नोंदणी केली, अशी माहिती ‘डीएमओ’ कार्यालयातर्फे देण्यात आली. दरम्यान, हरभऱ्याची हमीदराने खरेदी करण्याचे आदेशही प्राप्त झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

लातूरमधील १२ केंद्रांत लातूर, उदगीर, औसा, अहमदपूर, हल्सी तुगाव, चाकूर, रेणापूर, हलकी शिरूर अनंतपाळ, देवणी, लोणी, सताळा, शिरूर ताजबंद या केंद्रांचा समावेश आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांत लातूर केंद्रावरील ८०५, उदगीर ५४०७, औसा २८७५, अहमदपूर ३४२२, हल्सी तुगाव ४४०४, चाकूर ४०६१, रेणापूर १७९४, हलकी शिरूर अनंतपाळ ८८७, देवणी ३३९८, लोणी १३५१, सताळा ७५८, शिरूर ताजबंद येथील ६७५ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यापैकी ३३५३ शेतकऱ्यांकडून ३२ हजार ४९९ क्‍विंटल २९ किलो तुरीची खरेदी करण्यात आली. 

नोंदणीधारक शेतकऱ्यांना संदेश पाठविण्यासह हमीदराने तुरीची खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात हेक्‍टरी ११ क्‍विंटल १३ किलो हेक्‍टरी मर्यादेत तुरीची खरेदी केली जाते आहे. जवळपास ११ कोटी रुपये तुरीच्या चुकाऱ्यांसाठी आतापर्यंत प्राप्त झाले आहेत. चुकारे देण्याची प्रक्रियाही सुरू असल्याचे डीएमओ कार्यालयातर्फे सांगण्यात आले. 

हरभऱ्यासाठी नोंदणी

हमीदराने खरेदीसाठी निर्धारित तुरीसाठीच्या केंद्रावरूनच हरभऱ्याचीही खरेदी केली जाणार आहे. या केंद्रांवर नोंदणीला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. शिरूर ताजबंदचे केंद्र वगळता सर्व केंद्रांवर १२ हजार १११ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे प्रतीक्षेत असलेले हरभरा खरेदीचे आदेश प्राप्त झाले आहेत. हे आदेश प्रत्येक केंद्राकडे पाठविले जात असल्याचेही डीएमओ कार्यालयातर्फे सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com