Agriculture news in marathi; Registration of flyers in Guwahatibah shopping center in Jalgaon district is minimal | Agrowon

जळगाव जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्रांत उडदाची नोंदणी अल्पच

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

जळगाव  ः जिल्ह्यात शासकीय हमीभाव कडधान्य व सोयाबीन खरेदी केंद्रात उडीद विक्रीसंबंधी शेतकऱ्यांकडून हवा तसा प्रतिसाद अजूनही मिळालेला नाही. तर सोयाबीन विक्रीबाबतही फारसा प्रतिसाद मिळालेला नसल्याची माहिती आहे. 

जळगाव  ः जिल्ह्यात शासकीय हमीभाव कडधान्य व सोयाबीन खरेदी केंद्रात उडीद विक्रीसंबंधी शेतकऱ्यांकडून हवा तसा प्रतिसाद अजूनही मिळालेला नाही. तर सोयाबीन विक्रीबाबतही फारसा प्रतिसाद मिळालेला नसल्याची माहिती आहे. 

सोयाबीनची खरेदी ३७००, मुगाची ७०५० आणि उडदाची ५७०० रुपये प्रतिक्विंटल या दरात हमीभावात खरेदी केली जाणार आहे. जिल्ह्यात अंमळनेर, पाचोरा व जळगाव येथील केंद्रात ही खरेदी केली जाईल. खरेदीसंबंधी मार्केटिंग फेडरेशनने केंद्रांची नियुक्ती केली आहे. या केंद्रांमध्ये ही ऑनलाइन नोंदणी शेतकऱ्यांकडून करून घेतली जात आहे. मूग विक्रीसंबंधी ७०० शेतकऱ्यांनी, उडदासंबंधी २०० शेतकऱ्यांनी नोंदणी करून घेतली आहे. तर सोयाबीन विक्रीसंबंधी फारसा प्रतिसाद तिन्ही केंद्रांत मिळालेला नाही.

सोयाबीनची पेरणी जळगाव, चोपडा, यावल व पाचोरा भागात झाली होती. सध्या अर्ली सोयाबीनची मळणी सुरू आहे. तर काही शेतकऱ्यांच्या सोयाबीनची मळणी राहिलेली आहे. बाजारातील दर टिकून असल्याने सोयाबीन विक्रीसंबंधी शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. उडदाचे उत्पादन जिल्ह्यात अपवाद वगळता कुठेही चांगले मिळाले नाही. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परिणामी, उडीद विक्रीसंबंधीदेखील शासकीय खरेदी केंद्रात ऑनलाइन नोंदणीला प्रतिसाद मिळालेला नाही. 

नोंदणीसंबंधी प्रतिसाद लक्षात घेता अधिक दिवस प्रतीक्षा न करता खरेदी दिवाळीपूर्वी सुरू करण्याचे नियोजन मार्केटिंग फेडरेशनने केले आहे. या आठवड्यात एक किंवा दोन केंद्रांत खरेदी सुरू होण्याची शक्‍यता आहे. ३१ ऑक्‍टोबरपर्यंत या केंद्रांमध्ये मूग, उडीद व सोयाबीन विक्रीसंबंधी नोंदणी करण्याची मुदत आहे. 

 


इतर ताज्या घडामोडी
कळवण येथे शेतकरी संघटनेचे निर्बंधमुक्ती...नाशिक  : शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी...
नुकसानीमुळे पीककर्जाकडे शेतकऱ्यांचा कल पुणे ः अतिपावसामुळे खरीप पिकांचे नुकसान...
सटाणा शहरात कचऱ्यापासून होणार...नाशिक : सटाणा शहराने स्वच्छतेच्या बाबतीत...
पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आज...पुणे ः पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत कापूस...औरंगाबाद : आधी दुष्काळाचा ताण, त्यानंतर...
पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या...पुणे ः जिल्ह्यात पुढील वर्षी जुलै ते डिसेंबर २०२०...
काळ्या ज्वारीमुळे शासकीय खरेदीला ब्रेकअमरावती  ः अचलपूर खरेदी विक्री संघाला ज्वारी...
मराठवाड्यातील १४ लाख ५५ हजार हेक्‍टरवर...उस्मानाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १४ लाख...
अकोल्यात सोयाबीन पोचले ४१०० पर्यंतअकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला...
माकडांच्या उच्छादामुळे बोराच्या बागेचे...मानोरा जि. वाशीम ः तालुक्यातील  कारखेडा...
वाळवा तालुक्‍यात द्राक्ष उलाढालीत सात...वाळवा, जि. सांगली : अतिवृष्टीने द्राक्षशेतीचे...
कोल्हापूर जिल्ह्यात बँकांना २५००...कोल्हापूर : ‘‘जिल्ह्यात सर्वच बॅंकांना २ हजार ४३०...
कांदा साठवणूक निर्बंधाचा फेरविचार करानाशिक : गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात...
नांदेड विभागातील १ लाख ८५ हजार टन उसाचे...नांदेड : चार जिल्ह्यांतील ८ कारखान्यांनी यंदाच्या...
चुकीच्या तापमान नोंदीमुळे रत्नागिरीतील...रत्नागिरी  : जिल्ह्यात आंबा, काजू पिकांसाठी...
जागते रहो... कांदाचोरांचा अजून सुळसुळाट...फलटण शहर, जि. सातारा   ः सध्या...
सांगली जिल्ह्यात हळद पिकावर कंदकुज,...सांगली  ः महापूर आणि अतिवृष्टीमुळे कंदकुज...
ओला दुष्काळ जाहीर न केल्यास आंदोलन करू...कोल्हापूर   ः दक्षिण महाराष्ट्रात ओला...
खानदेश, मराठवाडा, विदर्भातील काही...पुणे  ः राज्यातील काही भागांत ढगाळ हवामान...
पाच जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य...अकोला  : जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य...