agriculture news in marathi, registration of gram producer in nagar, maharashtra | Page 2 ||| Agrowon

हरभरा विक्रीसाठी नगरमधील १३४८ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 मार्च 2018
नगर  ः ज्या ठिकाणी तूर खरेदी केंद्रे सुरू आहेत, त्याच ठिकाणी हरभरा खरेदी केंद्रे सुरू केली जाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये नऊ ठिकाणी हरभरा खरेदी केंद्रे सुरू होणार आहेत. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासह मनुष्यबळाची अडचणी भासू नये, यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनमधून देण्यात आली. हरभरा विक्रीसाठी आतापर्यंत जिल्हाभरातील १३४८ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. नोंदणीनुसार शेतकरी केंद्रावर आल्यानंतर खरेदी सुरू होणार आहे.
 
नगर  ः ज्या ठिकाणी तूर खरेदी केंद्रे सुरू आहेत, त्याच ठिकाणी हरभरा खरेदी केंद्रे सुरू केली जाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये नऊ ठिकाणी हरभरा खरेदी केंद्रे सुरू होणार आहेत. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासह मनुष्यबळाची अडचणी भासू नये, यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनमधून देण्यात आली. हरभरा विक्रीसाठी आतापर्यंत जिल्हाभरातील १३४८ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. नोंदणीनुसार शेतकरी केंद्रावर आल्यानंतर खरेदी सुरू होणार आहे.
 
जिल्ह्यामध्ये गतवर्षी तूर खरेदीचा प्रश्‍न गंभीर झाला होता. केवळ कृषी विभागाने तूर उत्पादनाचा योग्य अहवाल दिला नसल्याने ऐनवेळी तुरखरेदीचा प्रश्‍न निर्माण झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे यंदा कृषी विभागाने सावध पवित्रा घेतला. शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार जिल्ह्यामध्ये पाच हजार ४५० रुपये क्विंटलने नाफेडने सुरू केलेल्या खरेदी केंद्रांवर तुरीची खरेदी सुरू आहे. 
 
सध्या जिल्ह्यात नगर, जामखेड, नेवासा, पारनेर, वांबोरी (राहुरी), शेवगाव, श्रीरामपूर, मिरजगाव, श्रीगोंदा या नऊ ठिकाणी तूर खरेदी केंद्रे सुरू आहेत. तुरीसोबत हरभरा खरेदीचाही प्रश्‍न गंभीर आहे. त्यामुळे हरभरा खरेदीसाठी केंद्र सुरू करण्याची मागणी केली जाऊ लागली. त्यामुळे आता हरभरा खरेदी केंद्रही सुरू केली जात आहेत. ज्या ठिकाणी याआधी तूर खरेदी केंद्र सुरू आहे, त्याच ठिकाणी हरभरा खरेदी केंद्रही सुरू होणार आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये तसेच खरेदी केंद्रावर मनुष्यबळ कमी पडू नये यासाठी मार्केटिंग फेडरेशनने हा निर्णय घेतला आहे.
 
त्यामुळे जिल्ह्यामध्ये नऊ ठिकाणी हरभरा खरेदी केंद्र सुरू होणार आहेत. हरभरा विक्रीसाठी आतापर्यंत जिल्हाभरातील १३४८ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. नोंदणीनुसार शेतकरी केंद्रावर आल्यानंतर खरेदी सुरू होणार आहे, असे मार्केटिंग फेडरेशनमधून सांगण्यात आले.
टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
तणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...