Agriculture news in marathi Registration of gram sale started in 11 villages of Nanded district | Agrowon

नांदेड जिल्ह्यातील ११ गावांत हरभरा विक्रीची नोंदणी सुरू

टीम अॅग्रोवन
बुधवार, 29 एप्रिल 2020

नांदेड  : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हरभरा विक्री नोंदणीसाठी खरेदी केंद्रांवरील गर्दी टाळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर चार तालुक्यांतील ११ गावांत ‘आपले सरकार सेवा केंद्रा’वर नोंदणी करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.

नांदेड  : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हरभरा विक्री नोंदणीसाठी खरेदी केंद्रांवरील गर्दी टाळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर चार तालुक्यांतील ११ गावांत ‘आपले सरकार सेवा केंद्रा’वर नोंदणी करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. अन्य तालुक्यांत देखील या पद्धतीने लवकरच शेतकरी नोंदणी सुरु होईल, अशी माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली. 

‘नाफेड’तर्फे राज्य पणन महासंघ, विदर्भ सहकारी पणन महासंघ, ‘महाएफपीसी’ अंतर्गत जिल्ह्यात सबएजंट संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्यांची १५ खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. हरभऱ्याचा हमीभाव प्रतिक्विंटल ४ हजार ८७५ रुपये आहे. मात्र, खुल्या बाजारात त्यापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी दराने खरेदी केली जात आहे. त्यामुळे खरेदी केंद्रांवर हरभरा विक्रीसाठी शेतकरी गर्दी करत आहेत. 

सद्यःस्थितीत सबएजंट संस्थांकडे सोयीसुविधा अपुऱ्या आहेत. त्यामुळे शेतक-यांच्या शेतमालाची नोंदणी आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत नोंदणी केल्यास कोरोना संसर्ग टाळण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनाही ते सोईचे ठरेल. या बाबी विचारात घेऊन शासनाने आपले सरकार सेवा केंद्रांत नोंदणीसाठी परवानगी दिली आहे. शेतकऱ्यांचे आधार ओळखपत्र, ऑनलाइन पीक पेरा असलेला ७-१२ उतारा, वैयक्तिक संगणकीकृत पेरा प्रमाणपत्र, आधार क्रमांक संलग्न बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायाप्रत व बँक खात्याशी जोडलेला भ्रमणध्वनी क्रमांक आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. 

नोंदणीवेळी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्यासाठी पोलिस पाटील, सरपंच, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष आदी यंत्रणांनी सहकार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रवीण फडणीस यांनी दिले. 

११ गावांत नोंदणीची कार्यवाही सुरु 

नांदेड जिल्ह्यात सध्या प्रायोगिक तत्त्वावर गवंडगाव (ता.देगलूर), कासराळी (ता.बिलोली), मनाठा, निवघा, तळणी, तामसा (सर्व, ता. हदगाव), दिगडी (एम), कोठारी (चि.), मांडवा (कि.), मांडवी,सारखणी (सर्व ता.किनवट) येथील आपले सरकार सेवा केंद्रांवर नोंदणीची कार्यवाही सुरु आहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणी येत्या दोन-तीन दिवसांत नोंदणी सुरु होईल.


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...