agriculture news in marathi, Registration of Moog, Udda's Government purchase centre open today | Agrowon

जळगावात मूग, उडदाच्या शासकीय खरेदीची आजपासून नोंदणी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

जळगाव : मूग व उडदाची शासकीय खरेदी करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, गुरुवारपासून (ता. २७) ९ ऑक्‍टोबरपर्यंत खरेदीसंबंधीची नोंदणी पाचोरा, जळगाव व अमळनेर येथे होईल. सोयाबीन खरेदीसंबंधीची नोंदणी १ ऑक्‍टोबरपासून सुरू होणार आहे.

जळगाव : मूग व उडदाची शासकीय खरेदी करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, गुरुवारपासून (ता. २७) ९ ऑक्‍टोबरपर्यंत खरेदीसंबंधीची नोंदणी पाचोरा, जळगाव व अमळनेर येथे होईल. सोयाबीन खरेदीसंबंधीची नोंदणी १ ऑक्‍टोबरपासून सुरू होणार आहे.

मुगाची ६९७५ रुपये प्रतिक्विंटल या दरात, तर उडदाची ५६०० आणि सोयाबीनची ३३९९ रुपये प्रतिक्विंटल या दरात खरेदी केली जाईल. खरेदी लक्ष्यांक किती, या संदर्भात अजून स्पष्ट झालेले नाही. शासकीय खरेदी केंद्रात उडीद व मुगाची विक्री करण्यासाठी नोंदणी बंधनकारक आहे. त्यासाठी आधार क्रमांक, सातबारा (मूग, उडीद यांची नोंद असलेला) व बॅंक खाते क्रमांक द्यावा लागेल. आधार संलग्न असलेल्या बॅंक खात्यावर उडीद व मुगाचे चुकारे अदा केले जातील.

खरेदीसाठी सबएजंट म्हणून जळगाव येथे कृषी औद्योगिक सहकारी संस्था, पाचोरा येथे भडगाव शेतकरी सहकारी संघ व अमळनेरातही शेतकरी संघाची नियुक्ती केली आहे. शेतकऱ्यांना नोंदणीसाठी जळगाव येथे कृषी औद्योगिक सहकारी संस्थेच्या विसनजीनगरातील कार्यालयात संपर्क करावा लागेल. तर पाचोरा येथे शेतकी संघाच्या बाजार समितीच्या कार्यालयात आणि अमळनेर येथे अमळनेर शेतकरी संघाच्या कार्यालयात नोंदणी करता येईल.

सोयाबीनसंबंधीची नोंदणी ३१ ऑक्‍टोबरपर्यंत सुरू राहील, अशी माहिती मार्केटिंग फेडरेशनचे पणन अधिकारी परिमल साळुंखे यांनी दिली. मूग व उडदाच्या विक्रीसंबंधीच्या नोंदणीसाठी केवळ १४ दिवस मिळणार असल्याने सर्वच शेतकऱ्यांची नोंदणी शक्‍य नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

खरेदी १० ऑक्‍टोबरपासून शक्‍य

मूग व उडदाची खरेदी १० ऑक्‍टोबरपासून पाचोरा, जळगाव व अमळनेर येथील बाजार समित्यांमध्ये सुरू होईल. पाचोरा बाजार समितीतील भडगाव शेतकी संघाच्या कार्यालयात व अडत दुकानात खरेदी होईल. अमळनेर शेतकी संघाची खरेदीही अमळनेर बाजार समितीमध्ये होईल. जळगाव येथील कृषी औद्योगिक सहकारी संस्थेची खरेदी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संस्थेच्या गोदाम व कार्यालयात केली जाईल. सोयाबीनची खरेदी मात्र नोव्हेंबरमध्ये सुरू होईल, असे संकेत मिळत आहेत.

इतर बातम्या
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
यवतमाळ जिल्ह्यातील सात दुष्काळग्रस्त...यवतमाळ ः जनरेट्यामुळे दुष्काळ यादीत नव्याने...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...