नाशिक जिल्ह्यात दोन हजारांवर शेतकऱ्यांची नोंदणी

नाशिक : ‘‘जिल्ह्यात (ता.९) अखेर मक्यासाठी २१६२, बाजरीसाठी १८९, तर ज्वारीसाठी अवघ्या ३६ शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी केली आहे’’, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी विवेक इंगळे यांनी दिली.
Registration of over two thousand farmers in Nashik district
Registration of over two thousand farmers in Nashik district

नाशिक : ‘‘महाराष्ट्र स्टेट को ऑफ मार्केटिंग फेडरेशनद्वारे आधारभूत किंमत योजनेअंतर्गत भरडधान्य शेतमालाची खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात ९ खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. फेडरेशनच्या कार्यालयाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात (ता.९) अखेर मक्यासाठी २१६२, बाजरीसाठी १८९, तर ज्वारीसाठी अवघ्या ३६ शेतकऱ्यांनी  खरेदी केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी केली आहे’’, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी विवेक इंगळे यांनी दिली. 

जिल्ह्यात २ नोव्हेंबरपासून नोंदणी सुरू करण्यात आली होती. प्राप्त माहितीनुसार, मका नोंदणीसाठी नांदगाव केंद्रावर  सर्वाधिक शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. तर, लासलगाव केंद्रावर सर्वात कमी नोंदणी झाली आहे. बाजरीसाठी येवला तालुक्यात सर्वाधिक प्रतिसाद आहे. तर, नामपूर केंद्रावर अवघ्या एकच शेतकऱ्याने नोंदणी केली आहे. तर ज्वारीसाठी फक्त मालेगाव व देवळा केंद्रावर नोंदणी झाली आहे. 

शासनाने आधारभूत किमतीनुसार मका १८५० रुपये, ज्वारी २६२० रुपये, तर बाजरीला २१५० प्रतिक्विंटल दर जाहीर करण्यात आला आहे. ही खरेदी १ नोव्हेंबर तर ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. मका पिकाला दर चांगला असल्याने शेतकऱ्याची नोंदणीला पसंती आहे. तर  बाजारात ज्वारीला अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी असल्याची स्थिती आहे.

नोंदणी सुरू; खरेदी नाहीच

जिल्ह्यात नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी खरेदी प्रक्रियापूर्व संदेश फक्त देवळा केंद्रावरूनच पाठविले आहेत. मात्र कुठल्याही खरेदी केंद्रावर अद्याप प्रत्यक्ष खरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळे या कामकाजाला प्रत्यक्ष गती दिवाळी नंतरच येईल, असे बोलले जात आहे. त्यातच काही केंद्रावर नोंदणीत अडचणी येत आहेत. त्यामुळे त्या सोडविण्यासाठी  सूचना जिल्हा मार्केटिंग अधिकारी व सहाय्यक निबंधक यांनी केंद्रनिहाय केल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com