रब्बी हंगामातील भरडधान्य खरेदीसाठी नाव नोंदणी सुरू

जिल्ह्यात रब्बी हंगाम २०२०-२१मधील भरडधान्य ज्यामध्ये मका, ज्वारी, बाजरी खरेदीसाठी १ एप्रिलपासून शेतकरी ऑनलाइन नावनोंदणी सुरू करण्याबाबत शासनाकडून कळविण्यात आलेले आहे.
Registration for the purchase of coarse grains for the rabbi season begins
Registration for the purchase of coarse grains for the rabbi season begins

नाशिक : जिल्ह्यात रब्बी हंगाम २०२०-२१मधील भरडधान्य ज्यामध्ये मका, ज्वारी, बाजरी खरेदीसाठी १ एप्रिलपासून शेतकरी ऑनलाइन नावनोंदणी सुरू करण्याबाबत शासनाकडून कळविण्यात आलेले आहे. तर मे व जून महिन्यात नावनोंदणीनंतर भरडधान्याची खरेदी प्रस्तावित आहे.

जिल्ह्यात गत खरिपात एकूण ९ सब एजंट संस्थांच्या माध्यमातून भरडधान्य खरेदी करण्यात आली होती. त्याच संस्थांना चालू रब्बी हंगामातील भरडधान्य खरेदीचे कामकाज देण्यात आले असल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. भरडधान्य विक्रीसाठी शेतकरी नाव नोंदणी १ ते ३० एप्रिलदरम्यान सुरू राहणार आहे. शासनाने मका १८५०, ज्वारी २६२० व बाजरी २१५० रुपये प्रमाणे हमीभाव दिलेला आहे.

सबएजंट संस्थांद्वारे भरडधान्य खरेदीसाठी नाव नोंदणी प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांकडून सबएजंट कार्यालयात कागदपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. ज्यामध्ये रब्बी हंगाम-२०२१ मधील मका, ज्वारी, बाजरी इत्यादी पीक पेऱ्याची नोंद असलेला ऑनलाइन ७/१२ उतारा, शेतकरी बँक खात्याची बचत खाते पासबुकची झेरॉक्स प्रत, आधार कार्ड झेरॉक्स प्रत, सध्या चालू असलेला मोबाईल नंबर आदी असणे महत्त्वाचे आहे.

रब्बी हंगामात भरडधान्याचे उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांनी हमीभावाने विक्री करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करून खरेदी केंद्रांवर नाव नोंदणीसाठी कागदपत्रे सादर करावीत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शासनाच्या हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा. - विवेक इंगळे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, नाशिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com