Agriculture news in marathi Registration for purchase of Moog, Urad in Sangli started | Agrowon

सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरू

टीम अॅग्रोवन
रविवार, 27 सप्टेंबर 2020

सांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा खरेदी-विक्री संघात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने मूग व उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरु आहे.

सांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा खरेदी-विक्री संघात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने मूग व उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरु आहे. आजपर्यंत पाच शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी दिलीप पाटील यांनी केले.

जिल्ह्यात मूगाचे १०४६३ हेक्टर, तर उडदाचे १७०५८ हेक्टर क्षेत्र आहे. सध्या मूग आणि उडीद काढणी सुरु आहे. काही भागात काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्ह्यात नाफेडद्वारे मूग व उडीद हमीभाव खरेदी केंद्र सुरु केली आहेत. याची नोंदणी १५ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. बाजार समितीतील विष्णूअण्णा खरेदी विक्री संघात येऊन ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

नोंदणी करताना चालू वर्षाचा पिकपेरा असलेला सातबारा, आधारलिंक असलेले बॅंकेचे पासबूक आणि आधार कार्ड ही कागदपत्रे महत्वाची आहेत. मुगासाठी हमीभाव प्रतिक्विंटल ७ हजार १९६ रुपये, तर उडदासाठी हमीभाव ६ हजार रुपये प्रतिक्विंटल जाहीर करण्यात आला. सध्या जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांनी नोंदणी केली. 

नोंदणीला अल्प प्रतिसाद

नोंदणी सुरु होऊन दहा दिवस झाले. या दहा दिवसांत फक्त उडदाची विक्री करण्यासाठी पाच शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तर, मूग विक्रीसाठी एकाही शेतकऱ्यांने नोंदणी केलेली नाही. वास्तविक, हमीभावाने खरेदी केंद्रावर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात नोंदणी सुरु होणे गरजचे होते. नोंदणी उशीरा सुरु झाल्याने त्याकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे.

मूग, उडीद हमीभावाने खरेदीसाठी नोंदणी सुरु आहे. सांगलीतील विष्णूअण्णा खरेदी-विक्री केंद्रात येऊन ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. 
-दिलीप पाटील, जिल्हा पणन अधिकारी, सांगली


इतर ताज्या घडामोडी
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यातून मॉन्सून परतीच्या वाटेवर; पाऊस...महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या वाटेवर...
सांधेदुखी, सूजेवर आरोग्यदायी गोखरूगोखरू ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला...
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु...सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे...
खानदेशात पावसाने दाणादाण सुरूचजळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम...
जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य...बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला...
सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे...सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे...
साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर...सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने...