Agriculture news in marathi Registration for sale of cotton in Nanded district through Google link | Agrowon

नांदेड जिल्ह्यात कापूस विक्रीसाठी गुगल लिंकव्दारे नोंदणी 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 एप्रिल 2020

नांदेड ः खरेदी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भारतीय कापूस महामंडळ (सीसीआयच्या) खरेदी केंद्रांवर कापूस विक्रीसाठी गुगल डाॅक लिंकव्दारे नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या लिंकव्दारे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस संबंधित खरेदी केंद्रांवर स्वीकारण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी या लिंकव्दारे नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रवीण फडणीस यांनी केले आहे. 

नांदेड ः खरेदी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भारतीय कापूस महामंडळ (सीसीआयच्या) खरेदी केंद्रांवर कापूस विक्रीसाठी गुगल डाॅक लिंकव्दारे नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या लिंकव्दारे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस संबंधित खरेदी केंद्रांवर स्वीकारण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी या लिंकव्दारे नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रवीण फडणीस यांनी केले आहे. 

लॅाकडाऊनमुळे राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ (फेडरेशन) आणि भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय)तसेच खासगी कापूस खरेदी बंद असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस विक्री करता येत नाही. सद्यःस्थितीत तापमानात वाढ होत असल्यामुळे घरात कापूस साठवून ठेवणे धोकादायक झाले आहे. 

कापूस विक्रीसाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्याची मागणी शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी शुक्रवारी (ता. १०) ‘कोरोना’शी निगडित विविध विषयांवर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याशी संवाद साधला.कंधारचे उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर, तहसीलदार सखाराम मांडवगडे, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, सहाय्यक निबंधक जी. आर. कौरवार आदी व्हिडिओ कॅान्फन्सिंगमध्ये सहभागी झाले होते. 

बाजार समितीचे सचिव पी. डी. वंजे यांनी यावेळी कंधार तसेच इतर तालुक्यातील कापूस उत्पादकांना कापूस विक्रीसाठी येत असलेल्या अडचणीबाबत सविस्तर सूचना दिल्या. जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील शेतकऱ्यांनी देखील याच पद्धतीने नोंदणी करावयाची आहे. या लिंकची माहिती संबंधित तलाठी, कृषी सहायक हे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमार्फत त्या-त्या गावातील सरपंच आणि पोलिस पाटील, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

या लिंकव्दारे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस सीसीआयच्या संबंधित केंद्रांवर खरेदी करण्यात येईल. शेतकऱ्यांनी दर्जेदार कापूसच (एफएक्यू)विक्रीसाठी आणावा. खरेदी केंद्रावरील रुईच्या गाठी (गठाण) आणि सरकी वाहतुकीसाठी प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य केले जाईल. कापूस खरेदीसाठी केंद्र प्रमुखांनी इतर कुठलीही सबब पुढे करू नये, अशा सूचना डॉ. इटनकर यांनी केल्या. 

या ठिकाणी विक्रीची सुविधा 
भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआय) जिल्ह्यात नांदेड, किनवट, धर्माबाद, नायगाव, कुंटूर, बिलोली या सहा ठिकाणी खरेदी केंद्र आहेत.कंधार आणि लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना नांदेड आणि नायगाव येथील खरेदी कापूस विक्रीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 

खालील लिंकवर करा नोंदणी 
कंधार आणि लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeEQfYAAhXbiMJMiQj6CuT2vL0uDw6X... या गुगल डाॅक लिंकव्दारे नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...