जवळा बाजार, वसमत येथे कापूस विक्रीसाठी नोंदणी सुरू

हिंगोली : जवळा बाजार (ता.औंढानागनाथ) आणि वसमत येथील भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) केंद्रावर कापूस विक्रीसाठी नोंदणी सुरु झाली आहे. जवळा बाजार येथे ऑनलाइन लिंकव्दारे, तर वसमत येथे ऑफलाइन पद्धतीने शेतकऱ्यांची नोंदणी सुरु झाली आहे, अशी माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली.
cotton_25april_2020_1.jpg
cotton_25april_2020_1.jpg

हिंगोली : जवळा बाजार (ता.औंढानागनाथ) आणि वसमत येथील भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) केंद्रावर कापूस विक्रीसाठी नोंदणी सुरु झाली आहे. जवळा बाजार येथे ऑनलाइन लिंकव्दारे, तर वसमत येथे ऑफलाइन पद्धतीने शेतकऱ्यांची नोंदणी सुरु झाली आहे, अशी माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली. 

‘सीसीआय’च्या केंद्रावर कापूस विक्रीसाठी जवळा बाजार (ता.औंढा नागनाथ) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गंत शेतकऱ्यांनी https://forms.gle/x२Jau६D४FAdNgfib७ या लिंकव्दारे माहिती भरावी. त्यासाठी कापसाचा आपल्या सोबतचे सेल्फी छायाचित्र नोट कॅम अॅपव्दारे काढावे. माहिती भरताना हे छायाचित्र अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय आपली नोंदणी ग्राह्य धरली जाणार नाही.

शेतकऱ्यांचा एफएक्यू दर्जाचा कापूस असेल तरच शासकीय खरेदी केली जाईल. फरदड कापूस, कवडी कापूस, नॉन एफएक्यू दर्जाच्या कापसाची खरेदी केली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी स्पष्ट केले. जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) सुधीर मैत्रेवार, बाजार सभापती अंकुश आहेर यांनी शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन केले. 

वसमत बाजार समितीतंर्गत हयात नगर येथील केंद्रांवर तांत्रिक अडचणीमुळे ऑफलाइन नोंदणी सुरु आहे. त्यासाठी बाजार समितीतील कर्मचारी प्रदिप हरबले (मोक्र.९४०४८६३३६५) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com