Agriculture news in marathi, Registration of soybean sales in Parbhani, Hingoli district from 15th October | Page 2 ||| Agrowon

परभणी, हिंगोली जिल्ह्यात पंधरा ऑक्टोबरपासून सोयाबीन विक्रीची नोंदणी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 ऑक्टोबर 2021

परभणी : सोयाबीन (प्रतिक्विंटल ३९५० रुपये) खरेदीसाठी शुक्रवार (ता.१५) पासून नोंदणी सुरु करण्यात येणार आहे, ही माहिती राज्य सहकारी पणन महासंघाचे जिल्हा विपणन अधिकारी के. जे. शेवाळे यांनी दिली.

परभणी  : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १५ केंद्रांवर केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडतर्फे मूग (प्रतिक्विंटल ७२७५ रुपये), उडीद (प्रतिक्विंटल ६३०० रुपये) खरेदीसाठी मंगळवार (ता.५) पासून नोंदणी सुरु करण्यात आली. सोयाबीन (प्रतिक्विंटल ३९५० रुपये) खरेदीसाठी शुक्रवार (ता.१५) पासून नोंदणी सुरु करण्यात येणार आहे, ही माहिती राज्य सहकारी पणन महासंघाचे जिल्हा विपणन अधिकारी के. जे. शेवाळे यांनी दिली.

पणन महासंघातर्फे परभणी जिल्ह्यात परभणी, जिंतूर,बोरी, सेलू, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या सात ठिकाणी, तर हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, जवळा बाजार, वसमत, सेनगाव, साखरा हे सहा खरेदी केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. विदर्भ सहकारी पणन महासंघातर्फे परभणी जिल्ह्यातील  मानवत व गंगाखेड या केंद्रांवर शेतकरी नोंदणी सुरु होणार आहे.

या केंद्रांच्या ठिकाणी ऑनलाइन पध्दतीने  शेतकरी नोंदणी सुरु  करण्यासाठी संबंधित संस्थांना सूचना दिल्या आहेत.दरम्यान, मानवत येथे यंदा राज्य सहकारी पणन महासंघातर्फे खरेदी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. परंतु तूर्त मानवतचे नाव विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या यादीत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

नोंदणीसाठी कागदपत्रे ः 

तलाठ्याच्या सही शिक्यानिशीचा ऑनलाइन सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, बँक पासबुकवर शेतकऱ्यांचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोड स्पष्ट असावा, जनधन बँक खाते किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये, संबंधित तालुक्यातील व तालुक्याला जोडलेल्या केंद्राच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन शेवाळे यांनी केले.

 


इतर ताज्या घडामोडी
मुंबई विमानतळावरून होणार दैनंदिन ६६०...मुंबई : कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने...
बैलगाडा शर्यतप्रकरणी सोमवारी सुनावणी राजगुरुनगर, जि. पुणे : बैलगाडा शर्यत बंदीविरोधात...
वाढीव वीजबिलांबाबत शेतकऱ्यांनी घेतली...मंगरूळपीर, जि. वाशीम : तालुक्यातील कासोळा,...
वऱ्हाडात आता विधान परिषद निवडणुकीचा बार अकोला : विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुक...
सांगलीत एकावन्न हजार शेतकऱ्यांना १४...सांगली : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत...
उस्मानाबाद जिल्ह्यात पीकविम्यावरून...उस्मानाबाद : जिल्हा प्रशासन व पीकविमा कंपनीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव सुरूनाशिक : जिल्ह्यातील बाजार समिऱ्यांमध्ये कांदा...
रत्नागिरीतील १५०३ गावांची पैसेवारी ५०...रत्नागिरी : खरीप हंगामात भातपीक घेणाऱ्या गावातील...
शेतकऱ्यांनो, ऊसतोडी घेऊ नका : पाटीलकऱ्हाड, जि. सातारा : साखर कारखान्यांनी एकरकमी...
जळगावात महाविकासच्या ‘सहकार’ला...जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतून भारतीय जनता...
कापसाला यंदा दर; मात्र उत्पादकतेत मोठी...अकोला : कापसाचा दर वाढल्याने बाजारपेठेत उत्साही...
विठोबा शेतकरी गटाकडून सेंद्रिय...नांदेड : कोरोनाच्या काळात सेंद्रिय पद्धतीने...
अमरावती विभागात १२८९ गावांची पैसेवारी...अमरावती : या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी व...
सरकार आणि साखर कारखानदारांना विरोधात...परभणी : मराठवाड्यातील अनेक कारखान्यांनी यंदा अजून...
सांगली जिल्हा बँक निवडणूक : अठरा...सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी तीन...
शेतकऱ्यांचे ८० लाख रुपये घेऊन...गोवर्धन, जि. नाशिक : गिरणारे येथील एका...
राज्यात दुधाच्या गुणवत्तेबाबत तडजोड...संगमनेर, जि. नगर : राज्यात दुधाच्या शुद्धतेबाबत...
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपचा...जळगाव : जळगाव जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीवर...
परभणीत केवळ ७६७ टन डीएपी शिल्लक परभणी : जिल्ह्यात रब्बी हंगामातील सरासरी खताच्या...
निर्यातक्षम फळनिर्मितीतूनच शेतकऱ्यांची...नागपूर : शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता...