agriculture news in Marathi registration started for agri CET Maharashtra | Agrowon

कृषी ‘सीईटी’साठी नावनोंदणीला प्रारंभ

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 जून 2021

राज्यात बारावीच्या परीक्षा झालेली नसल्याने कृषी शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कशी होणार याविषयी गेल्या काही दिवसांपासून संभ्रमाची स्थिती होती. 

पुणे ः राज्यात बारावीच्या परीक्षा झालेली नसल्याने कृषी शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कशी होणार याविषयी गेल्या काही दिवसांपासून संभ्रमाची स्थिती होती. मात्र आता परीक्षा घेण्याचे निश्‍चित झाले असून, नावनोंदणी देखील सुरू झाली आहे. 

एरवी बारावीची परीक्षा होताच ‘सीईटी’ची प्रक्रिया जाहीर केली जाते. यंदा कोरोना आणि लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर बारावीच्या परीक्षा झालेल्याच नाहीत. त्यामुळे ‘सीईटी’ केव्हा आणि कशी होणार, त्यासाठी अभ्यासक्रम नेमका कसा राहील याविषयी राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना चिंता लागून होती. आता यातील संभ्रम दूर करण्यात आला आहे. ‘सीईटी’साठी अकरावीचा २० टक्के, तर बारावीचा ८० टक्के अभ्यासक्रम राहणार आहे. 

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त चिंतामणी जोशी यांनी कृषी ‘सीईटी’च्या नियोजनाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली नोंदणी (रजिस्ट्रेशन) प्रक्रिया येत्या सात जुलैपर्यंत चालणार आहे. अर्थात, विलंब शुल्कासह १५ जुलैच्या रात्री ११.५९ वाजेपर्यंत नोंदणीची संगणकीय प्रणाली सुरू राहणार आहे. 

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक (शिक्षण) डॉ. हरिहर कौसडीकर म्हणाले, की कृषी क्षेत्रातील आठ विद्याशाखांसाठी ‘सीईटी’द्वारे प्रवेश मिळणार आहेत. राज्यात यंदा १८९ महाविद्यालयांमधील १५ हजार २५७ जागांवर प्रवेश दिले जातील. यात ३८ सरकारी महाविद्यालये असून, १५१ महाविद्यालये खासगी शिक्षण संस्थाचालकांची आहेत. विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करून ‘सीईटी’च्या तयारीला लागावे. 

सलग दोन वर्षांपासून ‘सीईटी’चे वेळापत्रक विस्कळित होते आहे. गेल्या वर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढताच धास्तावलेल्या पालकांनी ‘सीईटी’ पुढे ढकलावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाला परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या. यंदा बारावीच्या परीक्षा न झाल्यामुळे ‘सीईटी’साठी नेमका कोणता अभ्यासक्रम असेल याविषयी विद्यार्थी चिंतेत होते. 

सर्व प्रवेश ‘सीईटी’वर होणार 
कृषी पदवीसाठीचे सर्व प्रवेश यंदाही पूर्णतः ‘सीईटी’च्या गुणांच्या आधारावरच होणार आहेत. या आधी ‘सीईटी’ पेपरचा ७० टक्क्यांचा स्कोअर आधी पकडला जात होता. उर्वरित ३० टक्क्यांसाठी बारावीत मिळालेली गुण गृहीत धरले जात होते. मात्र व्यावसायिक अभ्यासक्रमांचा दर्जा असल्याने कृषी प्रवेशासाठी सर्वंकष निकष फक्त ‘सीईटी’च्या गुणांचेच ठेवण्याची शिफारस केली गेली व ती गेल्या दोन वर्षांपासून अमलात आणली जात आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले. 


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात मुसळधारेची शक्यता पुणे : उत्तरेकडे मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
दूधप्रश्‍नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
‘द्राक्ष क्लस्टर’मध्ये नाशिकचा समावेश नाशिक : केंद्र सरकारने देशभरात विविध ५३ पिकांचे...
सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेला गती...पुणे ः पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना...
कोकणसह कोल्हापुरात पावसाने दाणादाण पुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड,...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे...सोलापूर ः राज्यातील फळबागांसाठी असलेल्या...
सिंधुदुर्ग पूरस्थितीच्या उंबरठ्यावरसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल ५०० ते २३००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते १६०० रुपये अकोला ः...
खानदेशातील आवार प्रगतीवर स्वारआवार (ता.जि. जळगाव) हे कापूस, दादर ज्वारीसाठी...
राज्यात २१८ तालुक्यांमध्ये दमदार पाऊस;...पुणे ः जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील २१८...
राज्यात खरीप पेरणी तीन टक्केनगर ः राज्यात यंदा आतापर्यंत खरिपाची सरासरीच्या...
दूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
विदर्भात पावसाचा जोर वाढणारपुणे : राज्यातील बहुतांशी भागात उन्हासह अंशतः...
अनेक वर्षांपासून जपली आले उत्पादकता अन्...आले पिकातील दरांत दरवर्षी चढउतार होते. मात्र...
भाजीपाला बीजोत्पादनातील ‘मास्टर’जिद्द, हिंमत, अभ्यास, ज्ञान घेण्याची वृत्ती व...
कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता पुणे : कोकण ते अरबी समुद्राच्या दरम्यान कमी...
पूर्वविदर्भात जोरदार पाऊस पुणे : राज्यातील काही भागांत पावसाचा दणका सुरूच...
जालन्यातील ऊस संशोधन केंद्र उभारणीला...पुणे ः ऊस शेतीच्या विकासासाठी विदर्भ,...
दूध दरांसाठी ग्रामसभांच्या ठरावाची...नगर : राज्यात दुधाला दर दिला जात नसल्याने दूध...
आता शेतकरीच करणार पीकपाहणी पुणे ः तलाठ्याकडून गावशिवारात प्रत्यक्ष पाहणी...