सोलापूर येथे शेतकरी मानधन योजनेच्या नोंदणीस प्रारंभ

सोलापूर येथे शेतकरी मानधन योजनेच्या नोंदणीस प्रारंभ
सोलापूर येथे शेतकरी मानधन योजनेच्या नोंदणीस प्रारंभ

सोलापूर : पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेतील नोंदणीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांच्या हस्ते कारंबा (ता. उत्तर सोलापूर येथे शनिवारी (ता.२४) प्रारंभ झाला. या वेळी गावातील काही शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पेन्शनकार्डचे वाटप करण्यात आले.

तालुका कृषी अधिकारी नंदकुमार पाचकुडवे, माजी सरपंच मल्लिनाथ तंबाके, प्रा. विनायक सुतार, मंडलाधिकारी भडकवाड, तलाठी मेकाले, भाजपचे शाखाध्यक्ष अप्पासाहेब गुंड, बाळासाहेब माने, राजू कदम, समाधान शिंदे, धर्मराज गायकवाड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. 

प्रातिनिधिक स्वरूपात गौरीशंकर पाटील, संतोष गुंड यांना पेन्शनकार्ड प्रदान करण्यात आले. १८ ते ४० या वयोगटातील आणि पाच एकर क्षेत्राच्या आतील शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येईल. या नोंदणी मोहिमेची सुरवात आज कारंब्यातून होते आहे.

कारंब्यातील अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन या वेळी बिराजदार यांनी केले. प्रा. सुतार यांनी कारंब्यातील अधिकाधिक शेतकरी या योजनेत सहभागी होतील यासाठी पुढाकार घेऊ, असे आश्‍वासन दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com