शेतीमाल विक्रीसाठी तीन जिल्ह्यांतील ३६८२ शेतकऱ्यांची नोंदणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत शासकीय खरेदी केंद्रावर शेतमाल विक्रीसाठी नोंदणीस शेतकऱ्यांचा प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारपर्यंत (ता.११) या तीन जिल्ह्यांत मुगासाठी २ हजार ३५८ शेतकऱ्यांनी, उडदासाठी २५० शेतकऱ्यांनी; तर सोयाबीनसाठी १ हजार ७४ शेतकऱ्यांनी अशी एकूण ३ हजार ६८२ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली. शुक्रवारी (ता.११) परभणी येथील केंद्रांवर ३ शेतकऱ्यांच्या १३ क्विंटल मुगाची खरेदी झाली. अन्य ठिकाणी केवळ नोंदणी सुरू असून खरेदी सुरू झाली नाही.

किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात नाफेडतर्फे मुखेड येथे ६२ शेतकऱ्यांनी मुगासाठी नोंदणी केली आहे. हदगाव आणि किनवट येथे खरेदी केंद्र प्रस्तावित आहे. विदर्भ को मार्केटिंगतर्फे भोकर, धर्माबाद, नायगाव या ठिकाणी खरेदी केंद्रे मंजूर आहेत. परंतु अजून या केंद्रांवर शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही. परभणी जिल्ह्यात नाफेडची परभणी, जिंतूर, सेलू, पालम, पाथरी, पूर्णा या सहा ठिकाणी केंद्रे मंजूर आहेत. यापैकी फक्त परभणी, पाथरी, पूर्णा या केंद्रांवर मुगासाठी ६०४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. शुक्रवारी (ता.११) परभणी येथील केंद्रावर ३ शेतकऱ्यांच्या १३ क्विंटल मुगाची खरेदी झाली. अन्य ठिकाणी खरेदी सुरू नाही.

परभणी जिल्ह्यात उडदासाठी ४; तर सोयाबीनसाठी ४७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. विदर्भ मार्केटिंग फेडरेशनतर्फे मानवत आणि गंगाखेड येथील खरेदी केंद्रावर मुगासाठी ६५० शेतकऱ्यांनी नोंदणी केली. परभणी जिल्ह्यात एकूण १३०५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.हिंगोली जिल्ह्यात नाफेडतर्फे हिंगोली, कळमनुरी, वसमत, जवळाबाजार, सेनगाव या पाच ठिकाणच्या केंद्रांवर मिळून मुगासाठी १ हजार ४२ शेतकऱ्यांनी, उडदासाठी २४६ शेतकऱ्यांनी, सोयाबीनसाठी १ हजार २७ शेतकऱ्यांनी असे एकूण २ हजार ३१५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे; परंतु अद्याप खरेदी सुरू झालेली नाही.

परिपक्वतेच्या अवस्थेत मूग, उडदाच्या उताऱ्यात घट आली तसेच पावसात भिजून डागील झाल्यामुळे शासकीय खरेदीच्या निकषात बसत नसल्याने शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कमी दराने मूग, उडदाची विक्री करावी लागत आहे. पावसात भिजल्यामुळे सोयाबीनमध्ये देखील ओलाव्याचे प्रमाण अधिक असल्याने शासकीय खरेदी केंद्रावर खरेदी सुरू करता येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com