आपत्तीत मदत करू इच्छिणाऱ्यांची होणार नोंदणी ः जिल्हाधिकारी मांढरे 

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती व संस्था यांच्या कामकाजात सुसूत्रता यावी यासाठी जिल्हा प्रशासनाने गुगल स्प्रेडशीट तयार केले आहे. यात दानशूर व्यक्ती व संस्था लॉगिन करून नोंदणी करू शकतील, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
Registration for those who want to help with the disaster: Collector Collector

कोरोनाचा समर्थपणे मुकाबला करताना जिल्हा प्रशासनास मदत करणारे अनेक हात पुढे सरसावले आहेत. या सर्व व्यक्ती व संस्थांच्या कामात समन्वय राहावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन नियंत्रण कक्षात उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर (९५४५५ ७३१०९) यांची नियुक्त केले आहे. 

त्याचबरोबर दानशूर व्यक्तिंची नोंदणी एकाच ठिकाणी व्हावी, त्याची पुनरूक्ती होवू नये यासाठी डिजिटल स्वरूपात गुगल स्प्रेडशीटचा उपयोग करण्यात येत आहे. यात व्यक्ती, संस्था, मोबाईल क्रमांक, ईमेल, मदतीचे स्वरूप, वस्तुंचा तपशील, संख्या, ज्या ठिकाणी मदत करावयाची आहे ते ठिकाण, तालुका व मदत पोहोच करण्याची तारीख आपल्या अभिप्रायासह नमूद करावयाची आहे. 

नोंदणी करण्यासाठी जिल्ह्याचे संकेतस्थळ https://nashik.gov.in यावरही अधिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी कळविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com